DC vs PBKS: करूण नायर नाही तर दिल्ली कॅपिटल्सचं चुकलं! आर अश्विनने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण
आयपीएल स्पर्धेतील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हातातला सामना गमावला. या सामन्यातील पराभवासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या करूण नायरला जबाबदार धरलं जात आहे. मात्र आर अश्विनने त्याची पाठराखण केली आणि काय चुकलं ते सांगितलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघ आमनेसामने आले होते. हा सामना सर्वोच्च धावसंख्या आणि ऐतिहासिक ठरला. कारण दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 7 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात एकूण 8 झेल सुटले आणि करूण नायरने 2 झेल सोडले आणि सामन्याचं चित्र बदललं. त्या झेलमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला असं बहुतांश क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण आर अश्विनला काही वेगळं वाटतं. त्याने यचा पराभवाचं विश्लेषण ते दोन झेल सोडून केलं आहे. त्याने या पराभवासाठी एकट्या करूण नायरला दोष देऊन चालणार नाही असं सांगितलं. झेल सोडण्याचं खरं कारण दिल्ली कॅपिटल्स संघ असल्याचं त्याच्या विश्लेषणातून दिसून येत आहे.
करूण नायर संघातच नव्हता…
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या प्लेइंग 11 मध्ये करूण नायर नव्हता. त्यामुळे त्याने संपूर्ण सामना बेंचवर बसून पाहिला. पण दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपताच केएल राहुलच्या जागी करूण नायरला क्षेत्ररक्षणासाठी उतरवलं. केएल राहुलने 152 धावांची खेळी केली, पण डिहायड्रेटेड झाल्याने मैदानात उतरला नाही. त्यामुळे करूण नायरला मैदानात उतरवलं. केएल राहुल नसल्याने ट्रिस्टन स्टब्सला विकेटकिपिंग करावी लागली. हा खेळाडू लाँग ऑन आणि लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे जर बदली खेळाडू उतरवायचा होता तर अभिषेक पोरेलला का संधी दिली नाही? अभिषेक पोरेल किपिंग करू शकला असता आणि स्टब्सने त्याच्या जागी क्षेत्ररक्षण केलं असतं. अश्विनने सांगितलं की, कीपरला डिहायड्रेशन झालं तर संघातील विकेटकीपिंगचा पर्याय वापरू शकतो.
View this post on Instagram
आर अश्विनने वरिष्ठ क्रीडापत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना सांगितलं की, करूण नायर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग 11 चा भाग नव्हता. त्यामुळे ज्या खेळाडूला मैदानात उतरायचं नाही, त्या खेळाडूला एक दिवस आधी सांगितलं जातं. त्यामुळे त्यांचं वेळेपात्र सामन्यासाठी तयार नसतं. करूण नायर सोबतही तसंच झालं. अशा स्थितीत झेल सुटू शकतो. आर अश्विनने सांगितलं की, करूण नायरची फिल्डिंग मी अनेकदा पाहिली आहे. तो जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे.
