AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : 1.50 लाखांच्या खाली आलं सोनं… ज्वेलरकडे धाव घेण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव !

Gold Rate Today 22 June 2026 Latest News Updates in Marathi: सोन्याच्या दरात एक दिवस आणि चांदीच्या दरात दोन दिवस स्थिरता राहिल्यानंतर, आज या धातूंच्या किमतीत पुन्हा बदल झालाय. मौल्यवान धातूंच्या दरातील या घसरणीची कारणे आणि देशातील दहा प्रमुख शहरांमधील 24-कॅरेट, 22 व 18-कॅरेट सोन्याचे दर घेऊया जाणून...

Gold Price Today : 1.50 लाखांच्या खाली आलं सोनं... ज्वेलरकडे धाव घेण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव !
22 जून रोजी देशात सोन्याचे दर किती ?
| Updated on: Jun 22, 2026 | 10:01 AM
Share

Gold Rate Today In India : या वर्षी व्याजदर वाढवण्याबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने दिलेले संकेत आणि डॉलरचे बळकटीकरण यामुळे सोन्यासारख्या व्याज न मिळवून देणाऱ्या मालमत्तेचे आकर्षण काहीसे कमी झाल्याचे दिसून येत आहे. एका दिवस स्थिर राहिल्यानंतर, आज राजधानी दिल्लीत 24-कॅरेट आणि 22-कॅरेट सोन्याच्या (प्रति 10 ग्रॅम) दरात 10 रुपयांची घट झाली आहे. मात्र यामुळो सोन्याचे एकू दल हे 1.50 लाखांच्या खाली आले आहेत. स्थिरतेच्या या कालावधीपूर्वी, 20 जून रोजी 24-कॅरेट सोन्याच्या (10 ग्रॅम) दरात 220 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली होती; मात्र, त्याआधीच्या चार दिवसांत 24 -कॅरेट सोने 5670 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोने 5200 रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीचा विचार करता, दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज त्यात घट झाली असून, प्रति किलो दरात 100 रुपयांची कपात झाली आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव घ्या जाणून

आज देशातील 10 प्रमुख शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटच्या सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया…

शहर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 
दिल्ली ₹1,46,220 ₹1,34,040 ₹1,09,700
मुंबई ₹1,46,070 ₹1,33,890 ₹1,09,550
कोलकाता ₹1,46,070 ₹1,33,890 ₹1,09,550
चेन्नई ₹1,48,360 ₹1,35,990 ₹1,13,690
बंगळुरू ₹1,46,070 ₹1,33,890 ₹1,09,550
हैदराबाद ₹1,46,070 ₹1,33,890 ₹1,09,550
लखनऊ ₹1,46,220 ₹1,34,040 ₹1,09,700
पाटणा ₹1,46,120 ₹1,33,940 ₹1,09,600
जयपुर ₹1,46,220 ₹1,34,040 ₹1,09,700
अहमदाबाद ₹1,46,120 ₹1,33,940 ₹1,09,600

चांदीतही घसरण कायम

चांदीच्या बाबतीत सांगायचे तर, दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज त्यात घट झाली आहे. या दोन दिवसांच्या स्थिरतेपूर्वी, सलग दोन दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलो 10,500 रुपयांची घसरण झाली होती. आज दिल्लीत चांदीच्या दरात प्रति किलो 100 रुपयांची घट झाली असून, त्यामुळे हा दर 2,49,900 रुपयांवर आला आहे. इतर प्रमुख महानगरांचा विचार करता, मुंबई आणि कोलकातामध्येही याची विक्री त्याच दराने होत आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीची किंमत 2,54,900 इतकी आहे; म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

या कारणांमुळे दबाव

एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी रिसर्च विश्लेषक) जतिन त्रिवेदी यांच्या मते, 2026 मध्ये संभाव्य व्याजदर वाढीबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने दिलेल्या संकेतांनंतर सोन्याच्या दरांवर दबाव वाढला आहे. यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला असून, सोन्यासारख्या व्याज न मिळवून देणाऱ्या मालमत्तांचे आकर्षण कमी झालं आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला