AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: शुबमन गिलमुळे द्विशतक हुकलं? इशान किशनने सांगितलं खेळीदरम्यान काय घडलं ते

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी लोळवलं. या सामन्यात भारताने विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर बाद झाला. या सामन्यात शुबमन गिल आणि इशान किशनने शतकी खेळी केली.

Video: शुबमन गिलमुळे द्विशतक हुकलं? इशान किशनने सांगितलं खेळीदरम्यान काय घडलं ते
Video: शुबमन गिलमुळे द्विशतक हुकलं? इशान किशनने सांगितलं खेळीदरम्यान काय घडलं तेImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 18, 2026 | 7:22 PM
Share

भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून खिशात घातली. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ 232 धावा करू शकला आणि 170 धावांनी पराभव झाला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन यांनी शतकी खेली केली. या सामन्यात दोघांना द्विशतकी खेळी करण्याची संधी होती. पण दोघांचं द्विशतक हुकलं. असं असताना कर्णधार शुबमन गिलमुळे द्विशतक हुकल्याचा आरोप इशान किशनने केला आहे. बीसीसीआयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इशान किशनने खेळीदरम्यान काय घडलं ते सांगितलं. शुबमन गिलच्या एका चॅलेंजमुळे 70 धावा कमी झाल्याचं त्याने मजेशीरपणे सांगितलं.

इशान किशनचं द्विशतक का हुकलं?

इशान किशनने अफगाणिस्तानविरूद्ध 79 चेंडूत 125 धावांची खेळी केली. ही खेळी पुढे नेत असताना त्याने खरोटेच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला, पण अलिखिलने त्याचा झेल पकडला आणि त्याचं 200 धावांचं स्वप्न भंगलं. इशान किशनने या चेंडूवर बाद होण्यापूर्वी दोन चेंडूत दोन षटकार मारले होते. तिसऱ्या षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला. यानंतर इशान किशनने सांगितलं की प्लान साधा होता. आहे तसं क्रिकेट खेळून शुबमन गिलसोबत भागीदारी करायची होती, असं इशान किशनने सांगितलं. इशानने सांगितलं की, ‘शुबमन गिलला वाटत होतं की मी फक्त बॅटिंग करत राहावी. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. आम्हाला माहिती होतं की जेव्हा मनात येईल तेव्हा गोलंदाजांवर प्रहार करू शकतो. प्लान साधा होता की चांगले शॉट्स मारत राहावं.’ इशानने गिलची फिरकी घेत सांगितलं की, “माझ्याकडून 6 षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याने माझी धावसंख्या 70 धावांनी कमी केली.”

मला स्ट्राईक का दिली नाही?

शुबमन गिलने इशान किशनला व्हिडीओत विचारलं की, मला 5-6 ओव्हरपर्यंत स्ट्राईक का दिली नाही? हा प्लान होता का? यावर इशान किशन म्हणाला की, तुला स्ट्राईक न देण्याची माझा प्लान नव्हता. मला फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळायचे होते.” इशान किशनने पुढे सांगितलं की, ‘एका चांगल्या खेळीत कर्णधाराचीही मोठी भूमिका असते. काही प्रसंगी, मला जलद फलंदाजी करून धावा करायच्या होत्या, पण गिलने मला सांगितले की अजून भरपूर वेळ आहे आणि वेळ घेऊ शकतो. गिलला मोठ्या धावा कशा करायच्या हे माहित आहे. त्यामुळे, त्याच्या उपस्थितीचा मला फायदा झाला.’

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा