आयपीएलनंतर दिग्वेश राठीचा पुन्हा धिंगाणा, अडचणीत वाढ होण्याची शक्यता; Video पाहा काय केलं?
दिल्ली प्रीमियर लीग 2025 स्पर्धा सुरु असून फिरकीपटू दिग्वेश राठीच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोटबूक सेलिब्रेशनस्ठा आयपीएल 2025 स्पर्धेतही वाद झाला होता. त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. आता काय झालं ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेत दिग्वेश राठी हा लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळला. पुढच्या पर्वातही तो या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसेल. कारण त्याने मागच्या पर्वात चांगाली गोलंदाजी केली होती. पण त्याचं नोटबुक सेलीब्रेशन खूपच चर्चेत राहिलं होतं. बीसीसीआयने त्याला दंडही ठोठावला होता. तसेच एका सामन्यासाठी बंदीही घातली होती. पण यातून त्याने काहीच धडा घेतलेला दिसत नाही. त्याने दिल्ली प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा धिंगाणा घातला. एका सामन्यात त्याने फलंदाज अंकित कुमार सोबत वाद घातला. यानंतर अंकितने असा धडा शिकवला की राठीला आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात दिल्ली प्रीमियरल लीग स्पर्धेचा सातवा सामना खेळला गेला. या दरम्यान साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि दिल्ली लायन्सचा ओपनर अंकित कुमार यांच्यात वाद झाला.
दिल्ली लायन्सच्या डावातील पाचव्या षटकात अंकितची ट्रिगर मूव्हमेंट पाहून राठी चेंडू टाकताना थांबला. राठीने याचा वापर आयपीएल स्पर्धेतही केला होता. त्यानंतर राठी राउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी राठी चेंडू टाकणार तेव्हाच अंकित बाजूला झाला. त्यामुळे दोघात वाद झाला. त्यानंतर राठी षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा अंकित तयार होता. त्याने दोन चेंडूत दोन षटकार मारले. अंकित कुमारने 11 चेंडूत चौकार आणि 6 षटकार मारत 96 धावा केल्या. त्याचं शतक फक्त चार धावांनी हुकलं. 16 व्या षटकात सुमित बेनीवालने त्याला बाद केलं. तर राठीने 3 षटकात 33 धावा दिल्या.
Digvesh rathi’s Software updated by batsman ankit kumar after a heated exchange in Delhi premier league pic.twitter.com/XKZKJQOOoV
— Sawai96 (@Aspirant_9457) August 6, 2025
दिल्ली लायन्स संघाने साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाला 26 चेंडू आणि 8 विकेट राखून पराभूत केलं. अंकितच्या 96 धावांच्या खेळीसबोत ख्रिस यादवने 42 चेंडूत 67 धावा केल्या. तर कर्णधार नितीश राणाने 5 चेंडूत 16 धावा केल्या. साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 20 षटकात 7 गडी गमवून 185 धावा केल्या होत्या. दरम्यान, दिग्वेश राठीने त्याचा स्वभावात काही बदल केला नाही तर भविष्यात त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण क्रिकेटमध्ये एका थराला आक्रमकता सहन केली जाते. त्यात अतिरेक झाला तर काही सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते किंवा डेमेरिट पॉइंट दिला जाऊ शकतो.
