वेंगसरकर BCCI मध्ये MCA चं प्रतिनिधीत्व करणार, मुख्यमंत्र्यांचे निकवर्तीय मिलिंद नार्वेकर MPL च्या गव्हर्निंग काऊन्सिलवर

वेंगसरकर BCCI मध्ये MCA चं प्रतिनिधीत्व करणार, मुख्यमंत्र्यांचे निकवर्तीय मिलिंद नार्वेकर MPL च्या गव्हर्निंग काऊन्सिलवर
Dilip Vengsarkar, Milind Narvekar

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची आता क्रिकेटच्या मैदानावर 'एन्ट्री' झाली आहे. मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) मुंबई प्रीमिअर लीगच्या (Mumbai Premier League) गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्त करण्यात आली आहे.

हेमंत बिर्जे

| Edited By: अक्षय चोरगे

Mar 21, 2022 | 5:13 PM

मुंबई : शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची आता क्रिकेटच्या मैदानावर ‘एन्ट्री’ झाली आहे. मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) मुंबई प्रीमिअर लीगच्या (Mumbai Premier League) गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्त करण्यात आली आहे. एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबत निर्णय घेण्यात आला. वानखेडे स्टेडियमच्या आवारात 109 अधिकृत स्वाक्षरी करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर आणि निलेश भोसले यांची गव्हर्निंग काऊन्सिलवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर मुंबई पातळीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मुंबई प्रिमिअर लीगचे आयोजन केले जाते. त्यातून होणाऱ्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी गर्व्हनिंग काऊन्सिलच्या सदस्याकडे दिली जाते. त्यामुळे या पदावरील व्यक्तीच्या निवडीला मोठे महत्त्व आहे. सध्याच्या कोव्हिड काळात ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करुन पार पाडणे हे नार्वेकरांसमोरील आव्हान असेल. कारण कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता नव्या जोमाने लीग आयोजित करण्यासाठी नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. आता नार्वेकरांची क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे.

MCA ने मुंबई पोलिसांचे 15 कोटी थकवले

वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस (Mumbai Police) थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकविले आहेत. त्यासंबंधित पोलिसांच्या 35 स्मरणपत्रांना एमसीएने केराची टोपली दाखवली आहे. थकबाकी (Arrears) आधी वसूल केल्यानंतरच क्रिकेट सामन्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे.मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले 14.82 कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठवली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या

Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर

IND vs AUS, Women’s World Cup 2022: सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, भारताला धूळ चारत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें