IND vs AUS, Women’s World Cup 2022: सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, भारताला धूळ चारत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women world cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ सापडला आहे. भारताचा (India) पराभव करून ऑस्ट्रेलियाने (Australia) उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म केलं आहे.

IND vs AUS, Women’s World Cup 2022: सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, भारताला धूळ चारत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये
Australia Womens team Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 2:38 PM

मेलबर्न :यसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women world cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ सापडला आहे. भारताचा (India) पराभव करून ऑस्ट्रेलियाने (Australia) उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म केलं आहे. सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचे आव्हान ठेवले होते, जे महिला विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठे आव्हान होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 6 विकेट आणि 3 चेंडू राखून पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. याचा अर्थ या संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले आहेत. यासोबतच भारताचा 5 सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 7 बाद 277 धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियन महिलांनी केवळ 4 विकेट्स गमावून ते लक्ष्य साध्य केले आणि 6 विकेट्सने विजय मिळवला. धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय आहे.

2 शतकी भागीदाऱ्यांमुळे विजय सोपा झाला

278 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. एलिसा हीली (72) आणि रॅचल हाईन्स (43) या जोडीने शतकी सलामी दिली. हाईन्स आणि हीली यांच्यात 121 धावांची भागीदारी झाली. यानंतर कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिस पेरी यांच्यात 103 धावांची भागीदारी झाली. या दोन भागीदारींनी संघाला विजयाच्या जवळ नेले.

यानंतर पावसाने सामन्यात थोडा व्यत्यय आणल्याने भारत सामन्यात पुनरागमन करु शकेल, असे वाटत होते. कारण पावसानंतर सामना सुरु झाल्यानंतर पूजा वस्त्राकरने अॅलिस पेरीला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. या विकेटनंतर सामना थोडा रोमांचक झाला पण भारताला आपला पराभव टाळता आला नाही. 97 धावा करून बाद झालेल्या कर्णधार मेग लॅनिंगच्या रूपाने भारताला 49 व्या षटकात आणखी एक यश मिळाले. परंतु तोवर खूप उशीर झाला होता. 49 व्या षटकात मेघना सिंह हिने ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला 97 धावांवर असताना पूजा वस्त्राकरकरवी झेलबाद केलं. लॅनिंगने 107 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 97 धावा फटकावल्या.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 8 धावांची गरज

49 षटकात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 8 धावांची गरज होती. भारताची कर्णधार मिताली राजने चेंडू अनुभवी झुलन गोस्वामीच्या हाती सोपवला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 8 धावांची अवश्यकता असताना बेथ मूनी हिने पहिल्या चेंडूवर शानदार चौकार लगावला, तर पुढच्या चेंडूवर दोन धावा वसूल केल्या. चार चेंडूत 2 धावांची आवश्यकता असताना मूनी हिने अजून एक चौकार लगावत 278 धावांचं लक्ष्य पार केलं.

भारताची शानदार फलंदाजी

तत्पूर्वी, ऑकलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ऑस्ट्रेलियाची जलदगती गोलंदाज डर्सी ब्राउनने हा निर्णय योग्य ठरवला. तिने चौथ्या षटकात स्मृती मानधनाला (10) आणि सहाव्या षटकात शेफाली वर्माला (12) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघ अडचणीत असताना मिताली राज (Mithali Raj) आणि यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) डाव सावरला. दोघींमध्ये शतकी भागीदारी झाली. मिताली आणि यस्तिका या दोघींनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. यादरम्यान, दोघींनी भारताकडून तिसर्‍या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा रेकॉर्ड केला. आधी मिताली राजने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर यास्तिका भाटियानेही अर्धशतक झळकावले. यास्तिका 59 धावांवर बाद झाली, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचं तसेच या महिला विश्वचषकातील पहिले अर्धशतक होते.

154 चेंडूत 130 धावांची भागीदारी

यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी या सामन्यात 154 चेंडूत 130 धावांची भागीदारी केली. भारतासाठी तिसऱ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ही भागीदारी अशा वेळी रचली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यास्तिका आणि मिताली या दोघांनीही या विश्वचषकात यापूर्वी काही खास कामगिरी केली नव्हती. पण, निर्णायक सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढण्याची वेळ आली, तेव्हा अनुभव आणि उत्साहाने सुसज्ज असलेली ही जोडी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरली.

मिताली राजची 68 धावांची खेळी

मिताली राजने 96 चेंडूत 68 धावा केल्या, जे तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 63 वे अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या 5 डावातील ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर 2021 रोजी मकाय येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात तिने 63 धावा केल्या होत्या. सध्याच्या विश्वचषकात मिताली राजचे हे पहिले अर्धशतक आहे. या अर्धशतकासह मिताली महिला विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारी फलंदाज ठरली आहे.

हरमनप्रीत-वस्त्राकरची फटकेबाजी

या विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतने तिचा फॉर्म कायम ठेवला आहे. तिने आक्रमक फटकेबाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तसेच ती नाबाद परतली. तिने पूजा वस्त्राकरसोबत 7 व्या विकेटसाठी 47 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. दोघींनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. हरमनने 47 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा फटकावल्या तर पूजाने 28 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 34 धावा फटकावल्या.

इतर बातम्या

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल

Delhi Capitals IPL 2022: Unsold ठरलेल्या पुण्याच्या कौशल तांबेला पाँटिंग, आगरकरांसमोर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

KXIP IPL 2022: ‘त्यांनी न्याय केला नाही’, किंग्स इलेव्हन पंजाबबद्दल सुनील गावस्करांचं महत्त्वाचं विधान

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.