IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये गटबाजी उघड, रोहित-हार्दिक भांडणात कोण-कोणाच्या बाजूने?

IPL 2024 : मुंबई इंडियन्समधील गटबाजी उघड झालीय. नव्या वृत्तानुसार टीममध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या वादात अन्य खेळाडूंची भूमिका समोर आलीय. मुंबई इंडियन्सचा आता लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शेवटचा सामना बाकी आहे. पण त्याने फार काही फरक पडणार नाहीय. कारण प्लेऑफचे दरवाजे आधीच बंद झाले आहेत.

IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये गटबाजी उघड, रोहित-हार्दिक भांडणात कोण-कोणाच्या बाजूने?
Rohit Sharma-Hardik PandyaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 9:23 AM

IPL 2024 चा सीजन मुंबई इंडियन्ससाठी धक्कादायक ठरला. चाहत्यांनी मुंबई इंडियन्सकडून अशा प्रदर्शनाची अपेक्षा केली नव्हती. क्रिकेटपेक्षा मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनशिपमध्ये बदल, टीममधील अंतर्गत मतभेद याचीच चर्चा जास्त झाली. मुंबई इंडियन्सचा अजून एक सामना बाकी आहे. पण त्यांची प्लेऑफमध्ये दाखल होण्याची अजिबात शक्यता नाहीय. मुंबईचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आहे. फक्त पॉइंट्स टेबलमध्ये तळाला राहण्याची नामुष्की टाळणं हेच आता मुंबई इंडियन्ससमोरच उद्दिष्टय असेल. शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना होत आहे. मुंबईला LSG ला हरवाव लागेल आणि पंजाबने त्यांचा शेवटचा सामना जिंकू नये, एवढीच इच्छा असेल. या दोन सामन्यांच्या निकालापेक्षा पुढच्या सीजनआधी मुंबई इंडियन्ससमोर मोठं आव्हान असणार आहे.

माजी कॅप्टन रोहित शर्मा आणि नवीन कॅप्टन हार्दिक पांड्यामधील मतभेद इतके वाढले आहेत की, मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये दोन गट पडले आहेत. रोहितला हटवून हार्दिकला टीमचा कॅप्टन बनवण्यावरुन मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने चाहत्यांच्या रोषाचा सामना केलाय. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच विजेतेपद पटकावली आहेत. नव्या रिपोर्ट्नुसार, मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यावरुन दोन गट पडले आहेत.

टीममध्ये कोण-कोणाच्या बाजूने?

मुंबई इंडियन्सच्या टीममधील भारतीय खेळाडू रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवावं या मताचे आहेत, तर परदेशी खेळाडू हार्दिकच्या बाजूने आहेत. दैनिक जागरणने हे वृत्त दिलय. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डी विलियर्सने हार्दिकच्या नेतृत्व गुणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. “युवा आणि कमी अनुभवी खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची नेतृत्वाची स्टाइल चालून जाईल. पण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह सारख्या प्लेयर्सना कदाचित पटणार नाही” असं डि विलियर्सने म्हटलं होतं. ‘

हार्दिकबाबत कोणी चांगलं म्हटलेलं?

मुंबई इंडियन्समधील परदेशी खेळाडूंना हार्दिकबाबत तक्रारी नाहीयत. टीम डेविडने हार्दिकच्या नेतृत्वाच कौतुक केलं होतं. हार्दिक आम्हाला एकत्र जोडून ठेवतो. मैदानावर खेळण्याचा स्वातंत्र्य देतो असं ऑस्ट्रेलियाच्या टिम डेविडने म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.