AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sahan Arachchigeची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर 134 धावांचं आव्हान, श्रीलंका रोखणार?

Sri Lanka A vs Afghanistan A Final 1st Inning Highlights : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं आहे. सहान अरचिगे याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

Sahan Arachchigeची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर 134 धावांचं आव्हान, श्रीलंका रोखणार?
sahan arachchigeImage Credit source: sri lanka cricket x account
| Updated on: Oct 28, 2024 | 1:19 AM
Share

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मात्र पवन रथनायके, सहान अरचिगे आणि निमेश विमुक्ती या त्रिकुटाने श्रीलंकेची लाज राखली. या तिघांनी केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला 130 पार मजल मारता आली आणि सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आता अफगाणिस्तान हे आव्हान पूर्ण करत आशिया कपची ट्रॉफी उंचावते की श्रीलंकेचे गोलंदाज या धावांचा बचाव करतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेसाठी सहान अरचिगे याने सर्वाधिक धावा केल्या. सहानने 47 बॉलमध्ये 6 फोरसह 64 रन्स केल्या. निमेश विमुक्थीने 23 धावांचं योगदान दिलं. तर पवन रथनायके याने 20 धावा जोडल्या. तर इतरांनी महाअंतिम सामन्यात घोर निराशा केली. श्रीलंकेच्या टॉप आणि मिडर ऑर्डरमधील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मात्र सहानने नाबाद राहत केलेल्या 64 धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेला सन्मानजनक आकडा गाठता आला. अफगाणिस्तानकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली त्यापैकी दोघांनाच विकेट्स मिळालल्या. बिलाल समी याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. बिलालने 4 षटकांमध्ये 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर अल्लाह गझनफर याने 4 ओव्हरमध्ये 14 रन्स देत दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

श्रीलंकेच्या तिघांचा अपवाद वगळता इतर सर्व अपयशी ठरले. मात्र आता आशिया चॅम्पियन व्हायचं असेल, तर श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सर्व धुरा आहे. फलंदाजांना इतक्या धावा करता आल्या नाहीत की गोलंदाज काही करु शकतील. मात्र उत्तम बॉलिंगला चिवट फिल्डिंगची साथ मिळाली तर काहीही होऊ शकतं, हे याआधी आपण पाहिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा तसंच काही पाहायला मिळणार की अफगाणिस्तान सामना एकतर्फी जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

श्रीलंका ए प्लेइंग ईलेव्हन : नुवानिदू फर्नांडो (कॅप्टन), लाहिरू उदारा (विकेटकीपर), यशोधा लंका, अहान विक्रमसिंघे, सहान अरचिगे, पवन रथनायके, रमेश मेंडिस, दुशान हेमंथा, निमेश विमुक्ती, निपुण रंसिका आणि एशान मलिंगा.

अफगाणिस्तान ए प्लेइंग ईलेव्हन : दरविश रसूली (कर्णधार), झुबैद अकबरी, सेदीकुल्ला अटल, मोहम्मद इशाक (विकेटकीपर), शराफुद्दीन अश्रफ, शाहिदुल्ला कमाल, करीम जनात, अल्लाह गझनफर, कैस अहमद, अब्दुल रहमान आणि बिलाल सामी.

आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.