ENG vs IND : केएल-पंतने टीम इंडियाला सावरलं, लॉर्ड्समध्ये चिवट झुंज, शुबमनसेना 242 धावांनी पिछाडीवर
ENG vs IND Lords Test Day 2 Stumps and Highlights In Marathi : टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 6 विकेट्स घेत इंग्लंडला ऑलआऊट केलं. त्यानंतर शुबमनसेनेने 3 विकेट्स गमावून 145 धावा केल्या आहेत.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडच्या 387 धावांच्या प्रत्युत्तरात 43 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 145 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. उपकर्णधार ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल ही जोडी नाबाद परतली आहे. तिसरा दिवस हा या सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या जोडीवर तिसऱ्या दिवशी मोठी खेळी करण्याची जबाबदारी असणार आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
इंग्लंडने 4 बाद 251 धावांपासून खेळाची सुरुवात केली. जो रुटने याने दिवसातील पहिल्याच बॉलवर फोर ठोकून कसोटी कारकीर्दीतील 37 वं, टीम इंडिया विरुद्धचं 11 वं आणि लॉर्ड्समधील 8 वं शतक ठोकलं. मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला झटपट 3 झटके दिले. बुमराहने कॅप्टन बेन स्टोक्स (44), जो रुट (104) आणि ख्रिस वोक्स (0) यांना आऊट केवलं. त्यामुळे इंग्लंड बॅकफटुवर गेली. मात्र जो रुट याच्या शतकानंतर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडलने 380 पार मजल मारली. कार्सने 56 तर जेमीने 51 धावा केल्या.
तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मज सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली.
भारताचा पहिला डाव
त्यानंतर टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने 3 खणखणीत चौकार ठोकून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र जोफ्रा आर्चर याने त्याच्या पहिल्या आणि टीम इंडियाच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये यशस्वीला 13 धावांवर बाद केलं.
यशस्वी आऊट झाल्यानतंर करुण नायर मैदानात आला. करुण आणि केएल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी चांगली जमली होती. करुणला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र जो रुटने स्लिपमध्ये डाव्या हाताने सुरेख कॅच घेतला. त्यामुळे करुणला मैदानाबाहेर जावं लागलं. करुणने 40 धावा केल्या.
करुणनंतर कर्णधार शुबमन गिल मैदानात आला. चाहत्यांना शुबमनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र इंग्लंड टीम शुबमनला मोठी खेळी करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरली. ख्रिस वोक्स याने शुबमनला विकेटकीपर जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 44 बॉलमध्ये 2 फोरसह 16 रन्स केल्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
That’s stumps on Day 2!
KL Rahul and Vice-captain Rishabh Pant are in the middle 🤝 #TeamIndia trail by 242 runs in the first innings
Scorecard ▶️ https://t.co/omiZVl0Plb#ENGvIND pic.twitter.com/KU2IRcQO0Z
— BCCI (@BCCI) July 11, 2025
शुबमन आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 107 अशी झाली. मात्र त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एकही विकेट गमावली नाही. टीम इंडियाने 43 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 145 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. केएल 53 आणि पंत 19 धावांवर नाबाद परतला. तर इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
