ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा पंजा, इंग्लंड 387 रन्सवर ऑलआऊट
England vs India 3rd Test Day 2 : टीम इंडियाकडे इंग्लंडला आणखी आधी रोखण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या ब्रायडन कार्स याने शेवटच्या टप्प्यात अर्धशतक ठोकलं.त्यामुळे इंग्लंडला 380 पार मजल मारता आली.

टीम इंडियाने इंग्लंड क्रिकेट टीमला तिसर्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑलआऊट केलं आहे. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिल्या डावात 112.3 ओव्हरमध्ये सर्वबाद 387 धावा केल्या. इंग्लंडसाठी जो रुट, जेमी स्मिथ आणि ब्रायडर्न कार्स या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर टीम इंडियाठी जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर झटपट 3 झटके दिले होते. त्यामुळे इंग्लंडला लवकर गुंडाळण्याची संधी होती. मात्र ब्रायडन कार्स याने अखेरच्या टप्प्यात अर्धशतक केलं. त्यामुळे इंग्लंडला 380 पार पोहचण्याच यश आलं.
इंग्लंडने दुसर्या दिवसाच्या खेळाला 84 व्या षटकापासून 4 बाद 251 धावांपासून सुरुवात केली. बुमराहने टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. बुमराहने 86 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर आधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानतंर बुमराहने 88 व्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलमध्ये इंग्लंडला सलग 2 झटके दिले. बुमराहने जो रुट आणि ख्रिस वोक्स या दोघांना आऊट केलं.
जो रुट याने शतकी खेळी केली. रुटने 199 बॉलमध्ये 10 फोरसह 104 रन्स केल्या. तर बुमराहने ख्रिस वोक्स याला पहिल्याच बॉलवर गोल्डन डक करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 7 आऊट 271 अशी झाली. त्यामुळे भारताकडे इंग्लंडला 300 धावांच्या आत रोखण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही.
जेमी स्मिथ-कार्सची अर्धशतकी खेळी
इंग्लंडसाठी शेवटच्या टप्प्यात जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स या जोडीने अर्धशतकी खेळी केली. जेमी स्मिथ याने 56 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. जोफ्रा आर्चर याने 4 धावांचं योगदान दिलं. बुमराहने जोफ्राला आऊट करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. तर मोहम्मद सिराज याने ब्रायडन कार्स याला बोल्ड केलं. यासह इंग्लंडचा डाव आटोपला. कार्सने 83 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरसह 56 रन्स केल्या.
बुमराहचा ऐतिहासिक लॉर्ड्समध्ये पंजा
Innings Break!
England are all out for 387 in the 1st innings
Jasprit Bumrah the pick of the bowlers with 5/74 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/0bkkeqskhe
— BCCI (@BCCI) July 11, 2025
बुमराह व्यतिरिक्त टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
