KL Rahul Century : केएल राहुलची ऐतिहासिक कामगिरी, लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक
KL Rahul Century At Lords : इंग्लंड दौऱ्यातील सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या केएल राहुल याने मोठा कीर्तीमान आपल्या नावावर केला आहे. केएलने लॉर्ड्समध्ये शतक ठोकलं आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इतिहास घडवला आहे. केएलने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली आहे. केएलने लॉर्ड्समध्ये खणखणीत आणि झुंजार शतक ठोकलं आहे. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केएलचं हे लॉर्ड्समधील एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. केएल कसोटीत लॉर्ड्समध्ये 1 पेक्षा अधिक शतक करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. लॉर्ड्समध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 3 शतकं करण्याचा विक्रम हा माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे.
केएलने जोफ्रा आर्चर याच्या बॉलिंगवर भारताच्या डावातील 67 ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एक धाव घेतली. केएलने यासह शतक पूर्ण केलं. केएलने यासह अनेक विक्रम त्याच्या नावावर केले. केएलने शतक पूर्ण करण्यासाठी 176 चेंडूंचा सामना केला. केएलने 56.82 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. तसेच केएलने या खेळीत 13 चौकार लगावले.
केएलचं कसोटी कारकीर्दीतील हे एकूण 10 वं, विदेशातील नववं आणि इंग्लंड विरुद्धचं चौथं शतक ठरलं. तसेच केएलचं हे या मालिकेतील ओपनर म्हणून दुसरं शतक ठरलं. केएलने पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात 137 धावांची खेळी केली होती.
लॉर्ड्समधील सलग दुसरं शतक
केएलचं जवळपास 4 वर्षानंतर लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक ठरलं. केएलने याआधी 12 ऑगस्ट 2021 रोजी इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी शतक केलं होतं. केएलने तेव्हा 250 बॉलमध्ये 129 रन्स केल्या होत्या. त्यानंतर आता केएलने पुन्हा एकदा शतक ठोकलं.
शतकवीर केएल राहुल
💯 runs 1⃣7⃣7⃣ deliveries 1⃣3⃣ fours
A knock of patience and composure from @klrahul ✨
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/Rde8gXhF5a
— BCCI (@BCCI) July 12, 2025
लॉर्ड्समध्ये शतक करणारे भारतीय
दरम्यान केएल राहुल लॉर्ड्समध्ये भारतासाठी शतक करणारा दहावा फलंदाज आहे. लॉर्ड्समध्ये भारतासाठी सर्वाधिक 3 शतकं करण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे. तर आता केएल 1 पेक्षा अधिक शतक करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. भारतासाठी या दोघांव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, राहुल द्रविड, अजित आगरकर, गुंडप्पा विश्वनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि विनू मंकड या 8 फलंदाजांनी प्रत्येकी 1-1 वेळा लॉर्ड्समध्ये शतक केलंय. विनू मंकड लॉर्ड्समध्ये शतक करणारे पहिले भारतीय होते.
