AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या सामन्यासाठी टीम जाहीर, या खेळाडूचा पत्ता कट, कुणाचा समावेश?

India vs England 2nd T20i : दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी टीम जाहीर करण्यात आली आहे. निवड समितीने एका खेळाडूला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर एका खेळाडूचा समावेश केला आहे.

IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या सामन्यासाठी टीम जाहीर, या खेळाडूचा पत्ता कट, कुणाचा समावेश?
tilak varma hardik pandya india vs englandImage Credit source: bcci
| Updated on: Jan 24, 2025 | 4:48 PM
Share

टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा शनिवारी 25 जानेवारीला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधीच इंग्लंड क्रिकेट टीमने दुसऱ्या टी 20i साठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टीम मॅनेजमेंटने संघात 1 बदल केला आहे. तसेच एका खेळाडूचा समावेश केला आहे. इंग्लंड क्रिकेटकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

इंग्लंडने गस एटकिन्सन याचा दुसऱ्या सामन्यातून पत्ता कट करण्यात आला आहे. तर एटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्स याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी गस एटकिन्सन याची कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात जोरदार धुलाई केली होती. एटकिन्सने 2 ओव्हरमध्ये 19 च्या इकॉनॉमी रेटने 38 धावा दिल्या. त्यामुळमुळेच गस एटकिन्सन याला डच्चू दिल्याचं म्हटलं जात आहे. तर गस एटकिन्सन याच्या जागी ब्रायडन कार्स याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

ब्रायडन कार्स याला आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये काही खास करता आलं नाहीय. ब्रायडन कार्सने 4 टी 20i सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर 7.67 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे आता कार्सला दुसर्‍या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. तसेच विकेटकीपर जेमी स्मिथ याचा 12 खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. स्मिथला संधी मिळणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

इंग्लंडकडून दुसऱ्या सामन्यासाठी खेळाडूंची नावं जाहीर

दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.