AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND 2nd Test : कॅप्टन शुबमन प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू देणार? इंग्लंड विरुद्ध कुणाला संधी?

India Playing 11 For 2nd Test Against England : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2-3 बदल होणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. आता कॅप्टन शुबमन गिल कुणाचा पत्ता कापणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

ENG vs IND 2nd Test : कॅप्टन शुबमन प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू देणार? इंग्लंड विरुद्ध कुणाला संधी?
Captain Shubman Gill and Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Jul 02, 2025 | 12:48 AM
Share

टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने भारतावर 5 विकेट्सने मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंनी निराशा केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? कुणाला संधी मिळू शकते? कुणाला वगळलं जाऊ शकतं? हे जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 43 ओव्हर बॉलिंग केली आणि 5 विकेट्स घेतल्या. बुमराहला दुसऱ्या डावात विकेट मिळाली नाही. मात्र बुमराहने चिवट बॉलिंग केली. मात्र बुमराहला इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

बुमराहने वर्कलोड मॅनजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 3 सामनेच खेळणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? हे निश्चित नाही. मात्र बुमराह निवडीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती कर्णधार शुबमन गिल याने दिली. तसेच बुमराहला पहिल्या सामन्यानंतर एकूण 7 दिवस विश्रांती मिळाली. त्यामुळे बुमराह खेळूही शकतो. मात्र बुमराह भारताच्या महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट बुमराहबाबत कोणतीही जोखीम घेणार नाही.

बुमराहच्या जागी कोण?

बुमराह जर दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसेल तर त्याच्या जागी कोण? हा प्रश्न उपस्थित होतो. अशात बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. अर्शदीपला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अर्शदीपची ही जमेची बाजू आहे.

शार्दूल ठाकुरऐवजी नितीश कुमार रेड्डी?

ऑलराउंडर शार्दुलला पहिल्या सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. शार्दुलने एकूण 5 धावा केल्या. तर कॅप्टन शुबमनने शार्दूलला बॉलिंगसाठी फार संधी दिली नाही. मात्र त्यानंतरही शार्दुलने 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे शुबमन शार्दुलच्या जागी नितीश कुमार रेड्डी याला संधी देऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघात किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.