ENG vs IND : महिला ब्रिगेड टी 20I मालिकेसाठी सज्ज, कोण करणार विजयी सुरुवात?
Women England vs India 1st T20i Live Streaming : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा नॉटिंघमधील ट्रेंट ब्रिजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मैदानात टी 20i सामन्याच्या आयोजनाची ही पहिलीच वेळ आहे.

मेन्स टीम इंडिया टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड विरुद्ध विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. यजमान इंग्लंडने लीड्समध्ये झालेला पहिला सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर 27 जून रोजी अंडर 19 टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 इंग्लंडवर 5 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता वूमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. वूमन्स टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेने सुरुवात होत आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20I आणि 3 वनडे मॅचेस खेळवण्यात येणार आहेत.
उभयसंघात 28 जून ते 12 जुलै दरम्यान टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 16 ते 22 जुलै दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. वूमन्स इंडियाचा इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामन्याबाबत सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना केव्हा?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना शनिवारी 28 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना कुठे?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंघममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल.
इंग्लंड टीम इंडियावर वरचढ
दरम्यान इंग्लंड टी 20i मध्ये टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने 30 पैकी 22 सामन्यांमध्ये भारतीय संघावर मात केली आहे. तर टीम इंडियाने 8 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा या मालिकेतील जास्तीत जास्त सामने जिंकून ही आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
