AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs ENG : Devon Conway याने इग्लंडविरूद्ध शतक करत रचला इतिहास

Devon Conway Century : न्यूझीलंड संघाचा खेळीडू डेव्हॉन कॉनवे याने वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पहिलं शतक ठोकलं आहे. इंग्लंड संघाने दिलेल्या लक्ष्याचा न्यूझीलंड संघ अगदी सहजतेने धावा करत आहे.

NZ vs ENG : Devon Conway याने इग्लंडविरूद्ध शतक करत रचला इतिहास
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 05, 2023 | 8:26 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप  2023 मधील इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघ इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. इंग्लंडने दिलेल्या 283 आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याने झंझावती शतक केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा करत इतिहास रचला आहे.  वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये शतक करणारा तो  पहिला खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीपासूनच डेव्हॉन कॉनवे याने आक्रमक पवित्रा घेतला होता. विल यंग आऊट झाल्यानंतर रचिन रविंद्र याच्यासोबत भागीदारी रचत विजयाचा भक्कम केलाय. डेव्हॉन कॉनवे याने 83 बॉलमध्ये 100 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. या शतकासह आपल्या कारकिर्दीमधील 5 व्या शतकाला गवसणी घातली आहे.

इंग्लंडची बॅटींग

न्यूझीलंड संघ बॅटींगला आल्यावर सुरूवातीलाच सॅम करन याने पहिल्या बॉलवर यंग याला आऊट करत खतरनाक सुरूवात केली होती. त्यानंतर खेळायला आलेल्या रचिन रविंद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयाजवळ आणलं. सुरूवातीला रचिनने काऊंटर अटॅक केला त्यानंतर डेव्हॉन कॉनवेने सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंड संघाला बॅकफूटला ढकललं. रचिनेही कॉनव्हे पाठोपाठ शतक केलं. रचिन रवींद्र हा  न्यूझीलंड संघासाठी कमी वयामध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यासोबतच पठ्ठ्याने पदार्पण सामन्यात शतक केलं आहे.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन