AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी विजय, हॅरी ब्रूकची अर्धशतकी खेळी व्यर्थ

England vs South Africa Highlights: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं.

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी विजय, हॅरी ब्रूकची अर्धशतकी खेळी व्यर्थ
south africa team
| Updated on: Jun 21, 2024 | 11:47 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मधील रंगतदार झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. त्यामुळे इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम याने हॅरी ब्रूक याचा शेवटच्या ओव्हरमध्ये कॅच घेतला आणि सामना आपल्या बाजूने फिरवला. इंग्लंडचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावाच करता आल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा सलग सहावा आणि सुपर 8 मधील दुसरा विजय ठरला.

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला सुरुवातीला ठराविक अंतराने झटके दिले. फिलिप सॉल्ट 11, जॉनी बेयरस्टो 16, जॉस बटलर 17 आणि मोईन अलीने 9 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 4 बाद 64 अशी झाली. मात्र त्यानंतर लियाम लिविंगस्टोन आणि हॅरी ब्रूक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाची आशा अखेरपर्यंत कायम राहिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली, मात्र दोघेही निर्णायक क्षणी आऊट झाले. लियाम लिविंगस्टोन 17 बॉलमध्ये 33 धावा करुन माघारी परतला. मात्र हॅरी ब्रूक मैदानात असल्याने आशा कायम होत्या.

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती. हॅरी ब्रूकने 20 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम याने उलट धावत अप्रतिम कॅच घेतला. मारक्रमने घेतलेला कॅच हा निर्णायक ठरला. हॅरी ब्रूक 37 चेंडूत 53 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर सॅम करन आणि जोफ्रा आर्चर या दोघांना इंग्लंडला विजयी करण्यात यश आलं नाही. आर्चरने 1* आणि सॅम करनने नाबाद 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ओटनील बार्टमॅन आणि एनरिख नॉर्खिया यादोघांनी 1-1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेला आश्वासक सुरुवातीनंतरही 20 ओव्हरमध्ये 163 धावांपर्यंतच पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलर याने 43 धावा जोडल्या. रिझा हेंड्रिक्स याने 19 रन्स जोडल्या. हेन्रिक क्लासेनने 8, कॅप्टन एडन मारक्रम 1, ट्रिस्टन स्टब्स 12* आणि केशव महाराजने 5* धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या. तर मोईन अली आणि आदिल राशिद या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.