AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL: श्रीलंकेची इंग्लंडमधील कामगिरी कशी? आकडे कुणाच्या बाजूने?

England vs Sri Lanka Test Head To Head Records: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवार 29 ऑगस्टपासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

ENG vs SL: श्रीलंकेची इंग्लंडमधील कामगिरी कशी? आकडे कुणाच्या बाजूने?
eng vs sl test
| Updated on: Aug 28, 2024 | 10:53 PM
Share

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. यजमान इंग्लंडने मालिकतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघ दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.दुसरा सामना 29 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने पहिला सामना जिंकल्याने त्यांचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे.तर श्रीलंका कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये दुसर्‍या सामन्यात चुरस पाहायला मिळू शकते. दोन्ही संघाने सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

इंग्लंडने 1 तर श्रीलंकेने 2 बदल केले आहेत. इंग्लंडमध्ये मार्क वूड याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे. तर श्रीलंकेने 2 बदल केले आहेत. कुसल मेंडीस आणि विश्वा फर्नांडो या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून हटवलं आहे. तर या दोघांच्या जागी पाथुम निसांका लहिरु कुमारा यांना संधी मिळाली आहे. ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर धनंजया डी सिल्वा याच्याकडे श्रीलंकेची धुरा आहे. अशात या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

उभयसंघातील आकडेवारी

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 37 कसोटी सामने झाले आहेत. इंग्लंडने 37 पैकी 18 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला केवळ 8 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघांमधील 11 सामने हे बरोबरीत सुटले आगेत. श्रीलंकेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये फक्त 3 सामन्यांमध्येच विजयी होता आलं आहे. इंग्लंडने आपल्या घरात श्रीलंकेचा 9 वेळा धुव्वा उडवला आहे. तर 7 सामने ड्रॉ राहिले आहेत.

दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

इंग्लंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल,कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नाययके.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.