ENG vs WI Super 8 Live Streaming: इंग्लंड-विंडिज 2 विश्व विजेते आमनेसामने, कोण जिंकणार?

England vs West Indies T20 World Cup 2024 Live Match Score: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात 2 विश्व विजेते संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडसमोर विंडिजचं आव्हान आहे.

ENG vs WI Super 8 Live Streaming: इंग्लंड-विंडिज 2 विश्व विजेते आमनेसामने, कोण जिंकणार?
ENG vs WI Super 8
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 11:58 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 42 व्या सामन्यात ग्रुप 2 मधील सुपर 8 फेरीत 2 विश्व विजेते संघ भिडणार आहेत. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज या संघांचा आमनासामना होणार आहे. जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. तर रोव्हमन पॉवेल विंडिजचं कर्णधारपद सांभाळणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीती दोन्ही संघांच्या या पहिल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगली चुरस पाहायला मिळू शकते. इंग्लंड विरुद्ध विंडिज सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना 20 जून रोजी होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया, येथे होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंड टीम: जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स आणि टॉम हार्टले.

वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), निकोलस पूरन (विकेटकीपर), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, शाई होप, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेद मॅककॉय, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, शिमरोन हेटमायर आणि शामर जोसेफ.

Non Stop LIVE Update
दादांनी योजनेचं नावच बदलल, आता लाडकी... शरद पवार गटातील नेत्याचा आरोप
दादांनी योजनेचं नावच बदलल, आता लाडकी... शरद पवार गटातील नेत्याचा आरोप.
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.