IND vs ENG : पहिल्याच सामन्यातील पराभवाचं खापर कर्णधार जोस बटलरने असं फोडलं, म्हणाला…

भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, टी20 मालिकेत इंग्लंडचं पारडं कायम झुकलेलं दिसलं आहे. 2012 पासून इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी20 मालिका जिंकलेली नाही. अशा स्थितीत पहिल्याच पराभवनंतर कर्णधार जोस बटलरने काय चुका झाल्या ते सांगितलं.

IND vs ENG : पहिल्याच सामन्यातील पराभवाचं खापर कर्णधार जोस बटलरने असं फोडलं, म्हणाला...
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 11:01 PM

भारताने पहिल्याच टी20 सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दव फॅक्टर लक्षात घेऊन कर्णधार सूर्यकुमार यादव याने हा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताच्या बाजूने झुकला असंच म्हणावं लागेल. भारताने 20 षटकात इंग्लंडचे सर्व गडी बाद करत 132 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी 133 धावांचं आव्हान मिळाला. भारताने हे आव्हान 12.5 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यात अभिषेक शर्माची तडाकेबाज फलंदाजी इंग्लंडवर भारी पडली. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 3 गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर फलंदाजीत संजू सॅमसनने आक्रमक सुरुवात करून दिली. पण 20 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 34 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडच्या दोन फलंदाजांना खातंही खोलता आलं नाही. तर पाच फलंदाज हे एकेरी धावसंख्येवर बाद झाले. कर्णधार जोस बटलरने एकाकी झुंज दिली आणि 44 चेंडूत 68 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. सामन्याच्या निकालानंतर जोस बटलरने रोखठोक मत मांडलं.

“आम्ही खरं तर या सामन्यात लवकर विकेट गमावल्या. हे अपेक्षित नव्हतं. ही विकेट खरंच फलंदाजीसाठी चांगली होती. त्यांना थोडीफार मुव्हमेंट मिळाली आणि आम्ही दोन विकेट झटपट गमवल्या. साहजिकच वेगवान धावसंख्येचे मैदान होते. त्या संघात खरोखर चांगले खेळाडू आहेत. आम्हाला जो खेळ खेळायचा आहे आणि अंमलात आणायचा होता. पण आम्ही आज चांगल्या गोलंदाजांविरुद्ध तसे करण्यास सक्षम ठरलो ना्ही.”, असं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सांगितंलं. “आम्हाला आक्रमक व्हायचे आहे, आम्हाला खेळण्यायोग्य बनायचे आहे. आम्ही अति-आक्रमक असलेल्या संघाविरुद्ध खेळत आहोत, त्यामुळे ते खरोखरच उत्कंठा वाढवणारं आहे. प्रत्येक ठिकाण आणि परिस्थितीचे आकलन करून चांगले खेळायचे आहे.”, असं जोस बटलर याने पुढे सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.