40 ओव्हरमध्ये 45 रन्स, संपूर्ण टीम ऑलआऊट, कसोटी नाही तर वनडे मॅचमध्ये असा संथ खेळ!

कसोटी क्रिकेट म्हटलं की संथ खेळ आलाच.... परंतु विशेष करुन वनडे क्रिकेटमध्ये धीमा खेळ होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका मॅचबद्दल सांगणार आहोत, ज्या एकदिवसीय मॅचमध्ये 40 ओव्हरमध्ये 45 धावा झाल्या आणि त्यातही सगळी टीम ऑलआऊट.. (England vs Canada 45 Runs of 40 Over on This Day)

40 ओव्हरमध्ये 45 रन्स, संपूर्ण टीम ऑलआऊट, कसोटी नाही तर वनडे मॅचमध्ये असा संथ खेळ!
England vs Canada
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 9:33 AM

मुंबईकसोटी क्रिकेट म्हटलं की संथ खेळ आलाच…. परंतु विशेष करुन वनडे क्रिकेटमध्ये धीमा खेळ होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका मॅचबद्दल सांगणार आहोत, ज्या एकदिवसीय मॅचमध्ये 40 ओव्हरमध्ये 45 धावा झाल्या आणि त्यातही सगळी टीम ऑलआऊट… असा कारनामा झाल्यानंतर मॅचमध्ये जान उरली नाही. प्रतिस्पर्धी टीमने 13.5 ओव्हरमध्ये दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. ही मॅच आजपासून बरोबर 41 वर्षांपूर्वी खेळली गेली. (England vs Canada 45 Runs of 40 Over on This Day)

कॅनडाचा संथ खेळ

हा सामना इंग्लंड आणि कॅनडा (इंग्लंड विरुद्ध कॅनडा) यांच्यात 14 जून 1979 रोजी ओल्डट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेला. कॅनडाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा केल्या. एकदिवसीय मालिकेत 45 धावसंख्या गाठण्यासाठी संघाला 40.3 षटकांचा कालावधी लागला. फ्रँकलीन डेनिसने संघासाठी सर्वाधिक 21 धावा केल्या. तो हिट विकेट पद्धतीने बाद झाला. 21 धावा करण्यासाठी त्याने 99 चेंडू खेळले.

दुसरा कोणताही फलंदाज दुहेरी आकड्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. इंग्लंडकडून बॉब विलिस आणि ख्रिस ओल्ड यांनी चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. यातील ख्रिस ओल्डने 10 षटकांत पाच मेडन ओव्हर फेकताना 8 धावा देऊन 4 बळी घेतले.

इंग्लंडच्या अन्य गोलंदाजांनीही चिवट गोलंदाजी केली. माईक हेन्ड्रिक्सने 8 षटकांत 5 बाद 1 विकेट घेतला, तर इयान बोथमने 9 षटकांत 12 धावा देऊनएका फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जेफ मिलरने दोन षटकांत एक धाव दिली. प्रतिस्पर्धी संघाने लक्ष्य मोठं दिलं नव्हतं पण ते पूर्ण करण्यासाठी 40 षटकांपेक्षा जास्त वेळ लागला.

इंग्लंडचा कॅनडावर विजय

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने ही छोटी धावसंख्या 13.5 षटकांत गाठली. ग्रॅहम गूच 21 धावांवर नाबाद परत आला आणि जेफ बॉयकॉटने 14 धावा केल्या. कॅप्टन माईक ब्रेअर्ली शून्यावर माघारी परतला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज डेरेक रँडल 5 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

(England vs Canada 45 Runs of 40 Over on This Day)

हे ही वाचा :

राजघराण्यातली मुलगी क्रिकेटपटूवर फिदा, अभिनेत्री म्हणून करिअर, शाहरुखसोबत ब्लॉकबस्टर हिट!

न्यूझीलंडने इंग्लंडला आस्मान दाखवलं, माजी कर्णधार म्हणतो, ‘भारतामुळे हे घडलं, तेव्हापासूनच सारा खेळ बिघडला!’

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.