मायलेकराने मैदान मारलं, प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला, दोघांकडूनही रन्सचा पाऊस, पुरुष संघाला पराभवाचा धक्का!

इंग्लंडची माजी अष्टपैलू खेळाडू एरन ब्रिंडलने (Arran brindle) आपला 12 वर्षाचा मुलगा हॅरीसह (harry Arran brindle) शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (England Women Cricketer Arran brindle Her 12 year old Son Fantastic Knock)

मायलेकराने मैदान मारलं, प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला, दोघांकडूनही रन्सचा पाऊस, पुरुष संघाला पराभवाचा धक्का!
मायलेकराने मैदान मारलं!
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 8:40 AM

मुंबई : इंग्लंड क्रिकेटसाठी 23 मे हा दिवस ऐतिहासिक ठरला. पुरुष-क्रिकेट सामन्यात माय-लेकराच्या जोडीने दिमाखदार खेळ केला. माय लेकराच्या जोडीने मिळून 143 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. लिंकन एंड डिस्ट्रिक्ट लीग डिव्हिजन 3 च्या सामन्यात ही अद्भुत कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडची माजी अष्टपैलू खेळाडू एरन ब्रिंडलने (Arran brindle) आपला 12 वर्षाचा मुलगा हॅरीसह (harry Arran brindle) शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (England Women Cricketer Arran brindle Her 12 year old Son Fantastic Knock)

मायलेकाची 143 धावांची अफलातून भागिदारी

एरन आणि हॅरी ब्रिंडलने ऑम्बीसीसी ट्रॉजन्ससाठी डावाची सुरुवात केली. त्यांच्या संघाला नेटलहेम क्रिकेट अकादमी इलेव्हनकडून विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य मिळाले होते. एरनने 101 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा फटकावल्या. त्याच वेळी हॅरीने 98 चेंडूत चार चौकारांसह नाबाद 32 धावांची खेळी करुन प्रतिस्पर्धी संघाला चांगलाच घाम फोडला. 12 वर्षीय हॅरीला आऊट करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने अनेक प्रयत्न केले. पण आईच्या सोबतीने त्याने तळ ठोकला ते शेवटपर्यंत….! दोघांच्या भागिदारीने संघाला 10 गडी राखून विजय मिळवता आला.

ब्रिंडल कमाल, हॅरीची धमाल

या सामन्यात 12 वर्षीय हॅरीने आपल्या 10 षटकांच्या कोट्यामध्ये चार विकेट्सही मिळवल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीने नेटलहेमची टीम 38.4 षटकांत 141 धावांवर ऑलआऊट झाली. आई आणि मुलाच्या या अनोख्या खेळीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. न्यूझीलंडच्या सुझी बॅट्स, भारताची स्नेहल प्रधान, इंग्लंडची हेदर नाइट आणि शार्लोट एडवर्ड्स यांनीही त्यांच्या खेळीचं ट्विटवरुन कौतुक केलंय. परंतु अ‍ॅरॉन ब्रिंडलने पुरुष क्रिकेट संघासमोर प्रथमच असा खेळ दाखवला नाही. याअगोदरही तिने अशी करामत करुन दाखवली आहे. ब्रिंडल पुरुष प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

एरन ब्रिंडलची क्रिकेट कारकीर्द

एरन ब्रिंडलने 1999 मध्ये डेन्मार्कविरुद्ध इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. तिने आपल्या कारकीर्दीत 11 कसोटी सामने, 88 एकदिवसीय सामने आणि 35 टी -20 सामने खेळले. तिने सुमारे 15 वर्ष क्रिकेट खेळलं. 2005 ते 2011 या काळात आई होण्यासाठी ती क्रिकेटपासून लांब घेतली. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तिने दिमाखदार सामन्यात शतक ठोकलं आणि त्यानंतरच्या दुसऱ्याच डावात अर्धशतक ठोकलं. 2005 मध्ये इंग्लंडच्या संघाने अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तेव्हा ब्रिंडलने मोठी भूमिका बजावली.

(England Women Cricketer Arran brindle Her 12 year old Son Fantastic Knock)

हे ही वाचा :

क्रिकेटसाठी कायपण! शूज चिकवटून खेळणाऱ्या झिम्बाम्वेच्या संघाला ‘प्युमा’ने पाठवलं गिफ्ट

WTC Final : इंग्लंडच्या भूमीत विराटची बॅट बोलते का? पाहा विराटचा खास इंग्लंड रिपोर्ट…!

Video : चहलच्या बायकोचे पुन्हा लटके-झटके; पडद्याआडून युजवेंद्र प्रेक्षक, धनश्री म्हणते…

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.