AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूचं कमबॅक

भारतीय पुरुष आणि महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. एकीकडे कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दुसरीकडे, महिला संघ 28 जूनपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे.

IND vs ENG : भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूचं कमबॅक
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
| Updated on: Jun 13, 2025 | 8:18 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 चौथ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यापासून करणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर होणार आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ पाच टी20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताने टी20 मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा केली होती. 13 जून रोजी इंग्लंडने टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनचं कमबॅक झालं आहे. सोफीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोड्या काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र आता तिचं संघात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर संघात वेगवान गोलंदाज लॉरेन फिलर जागा मिळाली आहे. पण फिरकीपटू सारा ग्लेनला या संघातून वगळण्यात आलं आहे. तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेली हीथर नाईटही या मालिकेला मुकली आहे.

सोफी एक्लेस्टोनही आजही आयसीसी महिला गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यावरून तिचं संघातलं महत्त्व अधोरेखित होतं. इंग्लंड महिला संघाची हेड कोच चार्लोट एडवर्ड्सने याबाबत आनंद व्यक्त करत सांगितलं की, ‘सोफीचं संघात येणं आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती आमच्या संघातील मॅच विनर खेळाडू आहे.’ दुसरीकडे, भारताने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. या संघात स्नेह राणा आणि शफाली वर्माचं कमबॅक झालं आहे. शफाली वर्माला वनडे संघातून वगळण्यात आलं आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाचे खेळाडू

इंग्लंड : नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), एम आर्लॉट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, पेज स्कॉलफिल्ड, लिन्से स्मिथ, डॅनी व्याट-हॉज, इस्सी वोंग.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.