AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025, AUS vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहाचं नुकसान, झालं असं की…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना निर्णायक वळणावर आला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फटका बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

WTC 2025, AUS vs SA : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहाचं नुकसान, झालं असं की...
जसप्रीत बुमराहImage Credit source: PTI
| Updated on: Jun 13, 2025 | 7:41 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं काही भारताला जमलं नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्याने फटका बसला. तसेच अंतिम फेरी तिसऱ्यांदा गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला फटका बसला आहे. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात पॅट कमिन्स याने 6 विकेट घेतल्या. यासह त्याने 2023-2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी पहिल्या स्थानावर जसप्रीत बुमराह होता. मात्र त्याला आता दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. पॅट कमिन्सने 18 सामन्यात 79 विकेट घेत पहिलं स्थान गाठलं आहे. आता दुसऱ्या डावात यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने 15 सामन्यात 77 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 32 विकेट घेतल्या होत्या. त्याने 13.06 च्या सरासरीने विकेट घेतल्या होत्या. मालिका गमावली असली तरी जसप्रीत बुमराहला प्लेयर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 या पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दुसऱ्या डावात 2 विकेट घेतल्या आणि 77 विकेटचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आणखी काही विकेट मिळाल्या तर बुमराहच्या पुढे निघून जाईल. चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन आहे. त्याने 17 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही गोलंदाजांच्या विकेटमध्ये आणखी भर पडेल यात काही शंका नाही. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतलेला भारताचा फिरकीपटू आर अश्विन 14 सामन्यात 63 विकेट घेत पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामना निर्णायक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर आटोपला. या डावात मिचेल स्टार्कने नाबाद 58 धावांची खेळी केली. पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळाली होती. यासह ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने दोन विकेट गमावल्या आहेत. अजूनही खेळ असून दोन्ही बाजूंना विजयाची तितकीच संधी आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी