Explainer : टी20 स्टार रिंकू सिंहला वनडेत राहावं लागेल सावध! का ते समजून घ्या

टीम इंडियामध्ये रिंकू सिंहकडे भविष्यातील खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याची निवड टी20 सोबत वनडे संघातही केली आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये त्याला सावध राहणं गरजेचं आहे. असं का ते एकदा समजून घ्या..

Explainer : टी20 स्टार रिंकू सिंहला वनडेत राहावं लागेल सावध! का ते समजून घ्या
Explainer : रिंकू सिंहचं वनडे क्रिकेटमध्ये तसंच काहीसं होणार नाही ना! जाणून घ्या का ते
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 9:49 PM

मुंबई: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी20 मध्ये 4-1 ने पराभूत केल्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या तिन्ही फॉर्मेटसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार आहेत. टी20 साठी सूर्यकुमार यादव, वनडेसाठी केएल राहुल, तर कसोटी संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. त्यात तीनच खेळाडू असे आहेत की त्यांची निवड तिन्ही फॉर्मेटमध्ये झाली आहे. यात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि मुकेश कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. तिन्ही खेळाडूंपैकी श्रेयस अय्यरलाच तिन्ही फॉर्मेटच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बरेचसे असे खेळाडू आहेत त्यांना दोन फॉर्मेटमध्ये निवडलं गेलं आहे. यात एक नाव रिंकू सिंह याचंही आहे. रिंकू सिंह याची निवड वनडे आणि टी20 मध्ये केली आहे. त्यामुळे आता रिंकू सिंहच्या वनडे निवडीबाबत क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिला टी20 सामना 10 डिसेंबरला होणार आहे. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने रिंकू सिंहला टी20 मध्ये अधिक वाव मिळणं गरजेचं आहे. रिंकू सिंह आता 26 वर्षांच्या असून त्याने आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट 187.50 चा आहे. टी20 मध्ये 150 पेक्षा अधिक स्ट्राईक रेट असणं ही मोठी बाब आहे. त्यामुळेच तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा आहे.रिंकू सिंह याला वनडे क्रिकेटमध्ये संधी मिळाली यात काही पोटदुखी नाही. पण निवड समिती त्याला फॉर्मेटमध्ये खेळवण्याची घाई तर करत नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटसोबत सरासरीही महत्त्वाची ठरते. नुसत्या स्ट्राईक रेटवर वनडेत काम चालत नाही. त्यामुळे त्याला वनडेतील निवड सिद्ध करावी लागणार आहे.

रिंकू सिंह समोर सूर्यकुमार यादव याचं उत्तम उदाहरण आहे. टी20 क्रिकेटमध्ये टॉपला असलेल्या सूर्याला वनडेत चांगलीच धडपड करावी लागली. अनेक सामन्यात त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तर त्याला तिनदा शून्यावर बाद होऊन परतावं लागलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही सुपर फ्लॉप ठरला. फक्त इंग्लंडविरुद्ध 49 धावा केल्या. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत त्याने जबरदस्त कमबॅक केलं. पहिल्याच सामन्यात 80 धावांची वादळी खेळी केली.

क्रिकेटचे तिन्ही फॉर्मेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे रिंकूला वनडे सामन्यात आपली वेगळी ओळख निर्माण करावी लागेल. टी20 सारखी खेळी वनडेत अनेकदा घातक ठरते. वनडेत 15 षटकांपासून 40 षटकांपर्यंतचा खेळ खूपच सावधपूर्ण खेळावा लागतो. यात विकेट गेली की संघावर दडपण येतं. त्यामुळे सुरुवातीला झटपट विकेट गेले की मधल्या फळीत आलेल्या रिंकूला सांभाळून खेळावं लागेल. त्यात रिंकूची फलंदाजी शैली आक्रमक असल्याने कितपत तग धरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...