रोहित शर्माची स्फोटक खेळी, कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. 2024 च्या T20 विश्वचषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. रोहित शर्माच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतकही आहे. रोहित आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळ दाखवला आहे. सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा केल्या. मात्र यानंतर त्याने गोलंदाजांना फटकवलं. रोहितने मिचेल स्टार्कविरुद्ध डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि फोर मारल्या. या ओव्हरमध्ये स्टार्कने 29 धावा दिल्या.
रोहितच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक
रोहित शर्माने 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतकही आहे. रोहितने भारतीय डावाच्या ५व्या ओव्हरमध्येच अर्धशतक झळकावले. या T20 विश्वचषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे. रोहितने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक केले होते. रोहित शर्माने 50 धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 52 धावा होती. यामध्ये एक वाइड आणि एक रन पंतच्या बॅटमधून आला होता.
T20 विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक
युवराज सिंग- 12 चेंडूत इंग्लंड विरुद्ध
केएल राहुल- 18 चेंडू विरुद्ध स्कॉटलंड
रोहित शर्मा- 19 चेंडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध
युवराज सिंग- 20 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सूर्यकुमार यादव- झिम्बाब्वे विरुद्ध २३ चेंडू
रोहितचे 200 टी-20 आंतरराष्ट्रीय सिक्स
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 200 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड ही त्याने आपल्या नावे केला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर 195 सिक्स होते. मिचेल स्टार्कविरुद्ध त्याने चार सिक्स मारले. त्यानंतर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पाचवा सिक्स मारला. भारतीय कर्णधाराच्या कारकिर्दीतील हा 157 वा सामना आहे. तसेच तो सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुफानी खेळी करत ४१ बॉलमध्ये ९२ रनची शानदार खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. पण आजच्या सामन्यात त्याने सगळी कसर भरुन काढली आहे. रोहित शर्माने या खेळीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
