AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruturaj Gaikwad CSK : फाफ डू प्लेसिसचा आता जळफळाट होईल – ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad CSK : यंदाच्या सीजनमध्ये दुसऱ्यांदा ऋतुराज आणि कॉनवेची जोडी सीएसकेसाठी सलामीला आली होती. याआधी केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोघे ओपनिंगला आले होते.

Ruturaj Gaikwad CSK : फाफ डू प्लेसिसचा आता जळफळाट होईल - ऋतुराज गायकवाड
Ruturaj gaikwadImage Credit source: social
| Updated on: May 02, 2022 | 3:47 PM
Share

मुंबई: नवीन जोडीदार डे्वॉन कॉनवेसोबत (Devon Conway) मिळून ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. IPL 2022 मध्ये काल चेन्नई सुपर किंग्सचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना झाला. ही भागीदारी पाहून फाफ डू प्लेसिसचा (Faf du Plessis) आता जळफळाट होईल, असं ऋतुराज गायकवाड गमतीने म्हणाला. फाफ डू प्लेसिस मागच्या सीजनपर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. पण आता तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन आहे. डेवॉन कॉनवे न्यूझीलंड संघाकडून खेळतो. SRH विरुद्धच्या सामन्यात काल कॉनवेसोबत मिळून त्याने सलामीसाठी 182 धावांची भागीदारी केली. ऋतुराज-कॉनवे जोडीने फाफ डू प्लेसिस आणि शेन वॅटसन जोडीचा 2020 मधील रेकॉर्ड मोडला. फाफ डू प्लेसिसने वॅटसन सोबत मिळून सीएसकेसाठी 181 धावांची भागीदारी केली होती. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही भागीदारी केली होती.

उमरान मलिकला टार्गेट केलं

यंदाच्या सीजनमध्ये दुसऱ्यांदा ऋतुराज आणि कॉनवेची जोडी सीएसकेसाठी सलामीला आली होती. याआधी केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोघे ओपनिंगला आले होते. सलामीच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला होता. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर काल हा सामना झाला. ऋतुराज आणि कॉनवेने धीमा सुरुवात केली. सहा ओव्हर्समध्ये त्यांनी 40 धावा केल्या, पण हळूहळू ऋतुराजने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने एसआरएचच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. खासकरुन स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टार्गेट केलं.

ऋतुराजचा शतक अवघ्या एक रन्सने हुकलं

ऋतुराजचा शतक अवघ्या एक रन्सने हुकलं. त्याने 99 धावा केल्या. ऋतुराज पुण्याचा आहे. कालचा सामनाही ऋतुराजच्या होम ग्राऊंडवर होता. त्याचे मित्र आणि कुटुंबीय हा सामना पहाण्यासाठी आले होते. “कॉनवे 55 चेंडूत 85 धावांवर नाबाद राहिला. सीएसकेने 202 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारली. फाफचा आता थोडाफार जळफळाट होईल. पण चालून जाईल. एक नवीन रेकॉर्ड केला, त्याचा आनंदच आहे” असं ऋतुराज सीएसके टीव्हीशी बोलताना म्हणाला.

मागच्या सीजनमध्ये ऋतुराज आणि डु प्लेसिस दोघांनी सीएसकेसाठी दमदार कामगिरी केली होती. पुण्याचा ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. डू प्लेलिस त्याच्यापेक्षा फक्त दोन धावांनी मागे होता. ऋतुराजने 635, तर डु प्लेसिसने 633 धावा केल्या होत्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.