T20 World Cup मध्ये भारतीय संघात ‘या’ खेळाडूंना संधी, संघ निवडीसाठी BCCI ची तारीख ठरली?

यंदाचा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. काही महिन्यांवर स्पर्धा येऊन ठेपली असल्याने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघ बांधणीला सुरुवात करणार आहे.

T20 World Cup मध्ये भारतीय संघात 'या' खेळाडूंना संधी, संघ निवडीसाठी BCCI ची तारीख ठरली?
भारतीय टी20 संघ
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 10:31 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केल्या होत्या. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवत असून संघ बांधणीलाही सुरुवात झाली आहे. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) आहे. दरम्यान पुढील आठवड्याच या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी विश्वचषकासाठीच्या 18 खेळाडूंची निवड 10 सप्टेंबर पर्यंत करायची आहे. पण रिपोर्ट्सनुसार इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी संपल्यानंतरच संघनिवड होईल असं सांगण्यात आलं आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वरिष्ठ निवड समितीसोबत पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे 6 ते 7 सप्टेंबर रोजी बैठक होईल. ज्यावेळी संघ निवड केली जाईल. नियमांनुसार  आयसीसी स्पर्धांसाठी 15 मुख्य खेळाडूंसह 3 स्टँडबाय खेळाडू असा संघ निवडावा लागतो. त्यानुसार BCCI ला संघ निवडावा लागणार आहे.

‘या’ खेळाडूंवर खास नजर

टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे असून रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे. पण शिखर धवन, पृथ्वी शॉ, मोहम्मद शमी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याच्या निवडीवरही सगळ्यांचे लक्ष असेल. तसंच अष्टपैलू हार्दीक पंड्यालाही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्याची निवड होईल की नाही? हा प्रश्नही कायम आहे. पंड्याला सध्या शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे तगडे पर्याय उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या 

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(For ICC t20 world cup 2021 indian team selection on 6th or 7th september says reports)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.