भिकारड्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जेसन गिलेस्पीने केली पोलखोल, स्पष्ट सांगितलं की…

पाकिस्तान, पीसीबी आणि क्रिकेट संघ हे भिकेला लागले आहेत, हे सर्वश्रूत आहे. असं असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जेसन गिलेस्पीने खळबळजनक आरोप केले आहेत. संघातील वागणून आणि पैसे याबाबत सर्वकाही उघड केलं.

भिकारड्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जेसन गिलेस्पीने केली पोलखोल, स्पष्ट सांगितलं की...
भिकारड्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जेसन गिलेस्पीने केली पोलखोल, स्पष्ट सांगितलं की...
Image Credit source: AFP
| Updated on: Jan 02, 2026 | 7:33 PM

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीकडे पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. पण त्यांनी या दरम्यान घडलेल्या घडामोडींनंतर सोडचिठ्ठी दिली. आता काही महिन्यांचा अवधी गेल्यानंतर जेसन गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच काय तर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी असताना अनेकदा अपमानकारक वागणूक मिळाल्याचंही सांगितलं. जेसन गिलेस्पीची एप्रिल 2024 रोजी पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर गॅरी कर्स्टनच्या खांद्यावर व्हाईट बॉल क्रिकेटची जबाबदारी होती. पण ऑक्टोबर महिन्यात गॅरी कर्स्टनने आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर गिलेस्पीने डिसेंबर महिन्यात पाकिस्तान संघाची साथ सोडली.

जेसन गिलेस्पी पदावरून पायउतार झाल्यानंतर नेमकं काय झालं त्याचा पर्दाफाश केला आहे. गिलेस्पीने सांगितलं की, पदावरून खराब कामगिरीमुळे पायउतार झालो नाही, तर पीसीबीची वागणूक आणि कामाच्या पद्धतीमुळे राजीनामा दिला. गिलेस्पीने एक्स या सोशल मिडिया खात्यावर लिहिलं की, “मी पाकिस्तान कसोटी संघाला प्रशिक्षण देत होतो. पीसीबीने माझ्याशी कोणतीही चर्चा न करता आमच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षकाला पदावरून काढलं. मुख्य प्रशिक्षक म्हणून मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. फक्त इतकंच नाही तर इतरही गोष्टी होत्या. त्यामुळे मला अपमानास्पद वाटलं.”

ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पीसीबी आणि गिलेस्पी यांच्या पैशांवरूनही वाद झाला. गिलेस्पीच्या मते त्याला पीसीबीने पैसेही दिले नाहीत. दुसरीकडे, पीसीबीने थातूरमातूर कारण देत पैसे दिले नसल्याचं सांगितलं आहे. गिलेस्पीने चार महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण न केल्याचं कारण दिलं आहे. जेसन गिलेस्पीने सांगितलं की, पीसीबीच्या अशा वागणुकीमुळे मला अपमानास्पद वाटलं आणि राजीनामा देण्यास भाग पाडलं. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांची गरज आहे की याबाबतही काही कळू शकलं नाही. जेसन गिलेस्पीनंतर पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आकिब जावेदच्या खांद्यावर दिली गेली आहे. पाकिस्तान क्रिकेट स्थिती काही वर्षात खालावलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघ सुमार कामगिरी करत आहे.