AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh इतके no ball टाकतो त्यामागे कारण काय? नेमकं इथे चुकतय

अर्शदीपचे इतके नो-बॉल पडतात, त्यामागे ओव्हर स्टेपिंग कारण आहे. गोलंदाजी करताना बऱ्याचदा त्याचा पाय रेषेबाहेर जातो. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनी अर्शदीपच्या गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवलं.

Arshdeep Singh इतके no ball टाकतो त्यामागे कारण काय? नेमकं इथे चुकतय
Arshdeep singhImage Credit source: AFP
| Updated on: Jan 28, 2023 | 10:40 AM
Share

IND vs NZ 1st T20 : पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. न्यूझीलंडने टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने 3 T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या पराभवाला अर्शदीप सिंहची लास्ट ओव्हरही कारणीभूत ठरली. त्याने या ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. अर्शदीपने इतक्या धावा दिल्या नसत्या, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. कारण या ओव्हरआधी स्थिती भारताच्या नियंत्रणात होती. या मॅचमध्ये पुन्हा एकदा अर्शदीपच्या नो बॉलने घात केला. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यात अर्शदीपचे हेच नो-बॉल महाग पडले होते.

4 ओव्हरमध्ये दिल्या 51 धावा

कालच्या मॅचमध्ये अर्शदीपने 20 व्या ओव्हरमध्ये 27 रन्स दिले. नो बॉलमुळे अर्शदीपने एक बॉलमध्ये 13 रन्स दिले. डॅरिल मिचेलने त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा लुटल्या, पहिल्या तीन चेंडूंवर तीन सिक्स त्यानंतर एक फोर मारला. त्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या 176 पर्यंत पोहोचली. रांचीमध्ये पहिल्या टी 20 सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह महागडा ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 51 रन्स देऊन फक्त 1 विकेट घेतला. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यात अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकले होते.

अर्शदीप कुठे चुकतोय?

अर्शदीपचे इतके नो-बॉल पडतात, त्यामागे ओव्हर स्टेपिंग कारण आहे. गोलंदाजी करताना बऱ्याचदा त्याचा पाय रेषेबाहेर जातो. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनी अर्शदीपच्या गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवलं.

“अर्शदीप आज फार प्रभावी ठरला नाही. यॉर्कर टाकून बॅट्समनला अडचणीत आणण्यासाठी तो ओळखला जातो. पण आज त्याने तशी गोलंदाजी केली नाही. माझ्यामते त्याने त्याच्या बॉलिंगबद्दल विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. हा प्रवास आहे. तुम्हाला चांगली सुरुवात मिळेल. पण काही सामन्यांमध्ये तुमच्या कौशल्याची चाचणी होईल. तुमचा स्वत:वर किती विश्वास आहे आणि मूलभूत गोष्टींवर तुम्ही किती मेहनत घेता त्यावर यश अवलंबून आहे. त्याने या गोष्टींवर काम केलं तर त्यात अधिक सुधारणा होईल” असं बांगर म्हणाले. लाँग रनअपमुळे नो बॉल का?

“नो बॉलच्या समस्येवर मात करण्यासाठी अर्शदीपने गोलंदाजी करताना त्याचा रन-अप कमी केला पाहिजे” असा सल्ला मोहम्मद कैफ यांनी दिला. “अर्शदीप खूप लांबून धावत येतो. याच लाँग रनअपमुळे ओव्हर स्टेपिंग होतेय. त्याची ऊर्जा सुद्धा तो यात वाया घालवतो. या नो बॉलला लाँग रनअप कारणीभूत आहे. तो साइड सुद्धा सतत बदलत असतो. कधी राऊंड द विकेट, कधी ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. त्याला बेसिक्सवर मेहनत घ्यावी लागेल.तो चांगला बॉलर आहे पण आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला नव्हता” असं कैफ म्हणाला. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?