AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचे चार सामने रद्द, उपांत्य फेरीचं भंगलं स्वप्न!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द जाला. त्यामुोळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. पण असं होणं ऑस्ट्रेलियाच्या पाचवीलाच पूजलेलं आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण दोनवेळा उपांत्य फेरीचं गणित यामुळेच भंगलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचे चार सामने रद्द, उपांत्य फेरीचं भंगलं स्वप्न!
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 26, 2025 | 3:22 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीत अखेर नको ते घडलं. ऑस्ट्रेलियाला यावेळेसही नशिबाने दगा दिला असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आयसीसी स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांना पूरक ठरतात. पण यात ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांतील द्वंद्व क्रीडाप्रेमींसाठी वेगळीच पर्वणी असते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचं गणित सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना महत्त्वाचा होता. पण यावेळीही ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका बसला असंच म्हणावं लागेल. त्यामुळे थेट उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न आता जर तरवर येऊन ठेपलं आहे. सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलियाला आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. मागच्या दोन पर्वात ऑस्ट्रेलियाला पावसाचा असाच फटका बसला होता.

16 वर्षांनंतर जेतेपद जिंकण्याच्या आत्मविश्वासाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे 2009 नंतर ऑस्ट्रेलियन संघ अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून पुन्हा उपांत्य फेरीत पोहोचेल का हे पाहणे बाकी आहे.

  • 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. परिणामी, ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित चुकलं.
  • 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलियाचे दोन सामने रद्द करण्यात आले. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ साखळी फेरीतच बाद झाला.
  • 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सातव्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे 2 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचण्याची अपेक्षा असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला फक्त एक गुण मिळाला.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी