AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : महेंद्रसिंग धोनी याचा गंभीरने त्यावेळी सर्वात जास्त इगो दुखावलेला, इरफान पठाणने केला मोठा खुलासा!

गंभीरचे माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनीसोबतही काही खास संबंध नसल्याचं सर्वांसमोर आलं आहे. गंभीरच्या अनेक स्टेटमेंटमधूनही अनेकदा त्याला धोनी फारसा काही आवडत नसल्याचं दिसून आलं होतं. अशातच याबाबत भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणे याने खुलासा केला आहे.

Gautam Gambhir : महेंद्रसिंग धोनी याचा गंभीरने त्यावेळी सर्वात जास्त इगो दुखावलेला, इरफान पठाणने केला मोठा खुलासा!
| Updated on: May 04, 2023 | 5:29 PM
Share

मुंबई  आयपीएलमधील सामन्यात भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यात झालेला राडा चांगलाचा चर्चेत आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर हे एकमेकांना भिडण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांमधील वाद आपण पाहिला आहे. 2013 साली दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची धुरा गौतम गंभीरकडे होती. गंभीरचे माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनीसोबतही काही खास संबंध नसल्याचं सर्वांसमोर आलं आहे. गंभीरच्या अनेक स्टेटमेंटमधूनही अनेकदा त्याला धोनी फारसा काही आवडत नसल्याचं दिसून आलं होतं. याबाबत भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणे याने खुलासा केला आहे.

काय म्हणाला इरफान पठाण?

IPL 2023 मध्ये, LSG आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील सामना बुधवारी लखनऊमध्ये होणार होता. मात्र, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यापूर्वी झालेल्या चर्चेत इरफानने गंभाीरबाबतची ती गोष्ट सांगितली. गौतम गंभीर याच्या त्या एका कृतीमुळे माहीचा इगो सर्वात जास्त दुखावला गेला होता.

2016 मध्ये पुणे सुपरजायंट्स विरूद्ध केकेआर यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर होता. महेंद्र सिंग धोनी बॅटींग करत असताना धोनीसाठी त्याने कसोटी क्रिकेटसारखी फिल्डिंग लावली होती. बेस्ट फिनिशर म्हणून ओळख असलेल्या धोनीला ही गोष्ट खूप लागली होती. इरफान पठाण त्यावेळी पुणे सुपरजायंट्स भाग होता.

गौतम गंभीर याने धोनीसाठी लावलेली फिल्डिंग त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआर दोनदा चॅम्पियन बनलं आहे. ज्यावेळी गौतम गंभीर धोनीच्या नेतृत्त्वाखाली संघात खेळत होता, त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. धोनी आणि गंभीर यांच्यात फार काही जमत नसल्याचं अनेकवेळा दिसून आलं होतं. त्यासोबच या खेळाडूंना संघात परत जागा न मिळण्यामागे धोनी असल्याची दबव्या आवाजात कायम चर्चा सुरू असते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.