रोहित शर्मा, विराट कोहलीपेक्षा अधिक क्रिकेटिंग शॉट्स ‘या’ भारतीय खेळाडूकडे, माजी सलामीवीर गौतम गंभीरचं मत

| Updated on: Oct 08, 2021 | 9:05 PM

आयपीएलमध्ये यंदाही अनेक धमाकेदार सामने पाहायला मिळाले अजून प्लेऑफचे सामने शिल्लक असतानाही अनेक खेळाडूंनी अप्रतिम कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहलीपेक्षा अधिक क्रिकेटिंग शॉट्स या भारतीय खेळाडूकडे, माजी सलामीवीर गौतम गंभीरचं मत
रोहित आणि विराट
Follow us on

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जगातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल क्रमाकांच्या फलंदाजांमध्ये मोडतात. कोहलीतर मागील बरीच वर्ष तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्तम खेळ करत असून रोहितनेही अलीकडे कसोटी क्रिकेटमध्ये आपली नवी ओळख निर्माण केली आहे. असं असतानाही जर कोणी म्हणेल की विराट आणि रोहितपेक्षा अधिक क्रिकेटिंग शॉट्स आणि उत्तम खेळ एका दुसऱ्याच भारतीय फलंदाजाचा आहे, तर आश्चर्यचकीत व्हालना. पण हो असचं झालं आहे.

माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने विराट आणि रोहित यांच्यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी आणि अधिक क्रिकेटींग शॉट्स हे पंजाब किंग्सचा कर्णघार केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे असल्याचं विधान केलं आहे. दरम्यान मागील काही वर्षात पंजाबची मदार सांभाळणाऱ्या राहुलने उत्तम प्रदर्शन कायम ठेवलं आहे. यंदाही पंजाब प्लेऑफमध्ये जाण्यापासून थोडक्यात हुकला असला तरी राहुलचं प्रदर्शन उत्तमच होतं.

कोणत्याही फलंदाजापेक्षा राहुलकडे अधिक शॉट्स

चेन्नईच्या विरुद्ध धमाकेदार 98 धावांची खेळी करणाऱ्या राहुलने सर्वांचीच मनं जिंकली. या सामन्यानंतरच गंभीरने राहुलचं कौतुक केलं. भारताच्या कोणत्याही फलंदाजापेक्षा अधिक शॉट्स राहुलकडे आहेत. तो उत्तम फलंदाजी करतो.  राहुलला अशीच फलंदाजी कायम ठेवण्याचा सल्ला देताना गंभीर इएसपीएन-क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला,

“जर तुम्ही (CSK विरुद्ध) अशाप्रकारे फलंदाजी करु शकता, तर कायम अशीच फलंदाजी का करत नाही? त्याच्याकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा अधिक क्रिकेटींग शॉट्स असून कोणत्याही भारतीय फलंदाजापेक्षा अधिक कला आहे. त्याने चेन्नईविरुद्धच्या खेळीतून पुन्हा हे दाखवून दिलं.” 

केएलचं अर्धशतक आणि चेन्नई पराभूत

चेन्नईने समोर ठेवलेले्या 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा सलामीवीर मयांक 12 धावा करुन बाद झाला. शार्दूलने त्याची विकेट घेतली. त्याच षटकात शार्दूलने सरफराजलाही बाद केले. त्यानंतर शाहरुख खानला दीपक चाहरने बाद केले. तर अखेरच्या काही षटकात शार्दूने सामन्यातील तिसरी विकेट घेत मार्करमला बाद केले. पण केएल राहुलला बाद करणे चेन्नईच्या गोलंदाजाना जमले नाही. त्याने केवळ 42 चेंडूत 7 चौकार आणि तब्बल 8 षटकार ठोकत नाबाद 98 धावा केल्या. ज्यासोबतच संघाला 6 गडी आणि 7 ओव्हर राखून विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

धोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला? चर्चा त्या Video ची तर होणारच

IPL 2021: आज सायंकाळी एकाच वेळी दोन मोठे सामने, पण साऱ्यांच्या नजरा एकाच सामन्यावर, ‘हे’ आहे कारण

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर

(Gautam Gambhir says Punjab kings captain KL Rahul has more shots than Rohit Sharma and Virat Kohli)