धोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला? चर्चा त्या Video ची तर होणारच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 07, 2021 | 10:17 PM

नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यानंतर चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरने स्टेडियममध्येच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले आहे.

धोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला? चर्चा त्या Video ची तर होणारच
दीपक चाहर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत

IPL 2021: आयपीएल 2021 मधील 53 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध पंजाब किंग्स या संघामध्ये झाला. सामन्यात चेन्नईला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पण संघातील एका खेळाडूसाठी मात्र हा दिवस फार महत्त्वाचा ठरला. संघाचा आघाडीचा गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याने सामन्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज  केलं.

सामना संपताच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात असणारा दीपक लगेचच स्टँडमसमध्ये गेला. त्याठिकाणी जाऊन काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या एका मुलीजवळ तो गेला. ही मुलगी म्हणजेच त्याची गर्लफ्रेंड होती. त्याने तिच्याजवळ जात तिला थेट प्रपोज केलं. त्याने तिला अंगठीही घातली. हे सारं पाहून तिही चकीत झाली. दोघांनी एकमेंकाना मिठी देखील मारली. दरम्यान हे सर्व सुंदर क्षण कॅमेरामननही टीपले असून सध्या सर्वत्र या प्रपोजचीच चर्चा आहे. विशेष म्हणजे चेन्नई आधीच प्लेऑफमध्ये गेला असल्याने आजचा पराभवाने त्यांच्या जास्त तोटा झाला नाही.

असा पार पडला सामना

प्रथम फलंदाजी मिळालेल्या चेन्नईच्या संघाला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचे बहुतेक फलंदाज सपशेल फेल होताना दिसले. केवळ सलामीवीर फाफ डुप्लेसीसने एकहाती झुंज देत 76 धावा कुटल्या. त्याने 55 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार खेचत 76 धावा केल्या. त्याला इतर कोणत्याच खेळाडूची साथ न मिळाल्याने चेन्नईचा संघ केवळ 134 धावापर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून अर्शदीप आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 तर शमी आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट पटकावली.

चेन्नईने समोर ठेवलेले्या 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा सलामीवीर मयांक 12 धावा करुन बाद झाला. शार्दूलने त्याची विकेट घेतली. त्याच षटकात शार्दूलने सरफराजलाही बाद केले. त्यानंतर शाहरुख खानला दीपक चाहरने बाद केले. तर अखेरच्या काही षटकात शार्दूने सामन्यातील तिसरी विकेट घेत मार्करमला बाद केले. पण केएल राहुलला बाद करणे चेन्नईच्या गोलंदाजाना जमले नाही. त्याने केवळ 42 चेंडूत 7 चौकार आणि तब्बल 8 षटकार ठोकत नाबाद 98 धावा केल्या. ज्यासोबतच संघाला 6 गडी आणि 7 ओव्हर राखून विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

(CSK Bowler Deepak Chahar Propose girlfriend after CSK vs PBKS match See Video)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI