AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर

31 वर्षीय मिथुन उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने त्याच्या 16 सामन्यांच्या IPL कारकिर्दीत फक्त 7 विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याआधीच RCBच्या गोलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, 16 मॅचचं IPL करिअर
कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 10:40 AM
Share

IPL 2021 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Chalengers Banglore)चा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)शी आहे. पण, या सामन्यापूर्वी RCB चा एक जुना खेळाडू निवृत्त झाला आहे. निवृत्त खेळाडूची IPL कारकीर्द 16 सामन्यांची आहे. त्याने 2009 ते 2013 दरम्यान 3 संघांसाठी हे सर्व सामने खेळले आहेत. मिथुन केवळ IPL मध्ये आरसीबीचा भाग नव्हता, त्याशिवाय मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्वही करत होता. आम्ही इथे ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत त्याचे नाव अभिमन्यू मिथुन आहे. 31 वर्षीय मिथुन उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने त्याच्या 16 सामन्यांच्या IPL कारकिर्दीत फक्त 7 विकेट्स घेतल्या. ( Former India and RCB pacer Abhimanyu Mithun retires, Played only 16 IPL match)

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर केवळ 10 महिन्यांनी मिथुनची भारतीय क्रिकेटमध्ये निवड झाली. टीम इंडियामध्ये त्याला श्रीसंतच्या जागी संधी मिळाली. अभिमन्यू मिथुनने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 4 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 5 वने डे सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. मिथुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 103 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 338 विकेट्स घेतल्या. लिस्ट ए आणि टी -20 सामन्यांमध्ये त्याच्या 205 विकेट्स आहेत.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला

अभिमन्यू मिथुन आधी भालाफेक करायचे. पण त्यानंतर त्याने भालाफेक सोडून क्रिकेटमध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळली. नोव्हेंबर 2019 मध्ये, देशांतर्गत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये हॅट्रिक घेणारा मिथुन एकमेव गोलंदाज ठरला.

निवृत्तीवर मिथुन काय म्हणाला

निवृत्त झाल्यावर मिथुन म्हणाला की, “देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. याबद्दल मला किती आनंद आहे, याचं वर्णन मी करु शकत नाही. हे क्षण मला नेहमी लक्षात राहितील. मी माझं भविष्य आणि कुटुंबाकडे पाहून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मी हे देखील सांगू इच्छितो की, कर्नाटकमध्ये युवा वेगवान गोलंदाज भरलेले आहेत, जर मी योग्य वेळी निवृत्त झालो नाही तर त्यांना संधी कशी मिळेल.” अभिमन्यू मिथुन ऑक्टोबर 2021 मध्ये निवृत्तीपूर्वी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला.

हेही वाचा:

IPL 2021: कोलकात्यासमोर राजस्थानच्या फलंदाजानी गुडघे टेकले, 86 धावांनी केकेआरचा मोठा विजय

IPL 2021: हर्षल पटेलने तोडला बुमराहचा दमदार रेकॉर्ड, आता नजर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरीवर

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.