IPL 2021: हर्षल पटेलने तोडला बुमराहचा दमदार रेकॉर्ड, आता नजर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरीवर

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचा गोलंदाज हर्षल पटेलने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने सुरुवातीपासून पर्पल कॅप स्वत:कडे ठेवत दमदार कामगिरी केली आहे.

IPL 2021: हर्षल पटेलने तोडला बुमराहचा दमदार रेकॉर्ड, आता नजर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरीवर
हर्षल पटेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Oct 07, 2021 | 10:01 PM

IPL 2021: आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक ज्या गोलंदाजाची चर्चा आहे तो म्हणजे आरसीबी संघाचा हर्षल पटेल (Harshal Patel). स्पर्धेच्या सुरुवातीपासून पर्पल कॅपवर एकहाती सत्ता हर्षलचीच असून तो कोणत्याच दुसऱ्या खेळाडूला ही कॅप पटकावण्याची संधी तो देत नाहीये. दरम्यान याच उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) एक मोठा रेकॉर्डही मोडला आहे.

नुकत्याच झालेल्या आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (RCB vs SRH) सामन्यात हर्षलने 33 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यासोबतच त्याने एका आयपीएलच्या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज हा मानही पटकावला आहे.  त्याने मुंबई इंडियन्सचा (MI) दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकलं आहे. बुमराहने 2020 च्या पर्वात  27 विकेट्स घेतले होते. तर हर्षलने आतापर्यंत 13 सामन्यात 14.00 च्या सरासरीने 29 विकेट्स मिळवल्या आहेत. यावेळी त्याने हॅट्रिकही घेतली असून 27 धावा देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

आता लक्ष्य सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर

हर्षलने आतापर्यंत 29 विकेट्स घेतल्या असून एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान वेस्ट इंडिजच्या डीजे ब्राव्हो याला आहे. ब्रावोने 2013 मध्ये 32 विकेट्स घेतले होते. या कामगिरीपासून हर्षल केवळ 4 विकेट दूर आहे. दरम्यान आरसीबी प्लेऑफमध्ये गेला असल्याने ते अजून सामने खेळणार आहेत. ज्यामुळे हर्षलकडे आणखी विकेट्स पटकावण्याची संधी आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-5 गोलंदाज

1. हर्षल पटेल (आरसीबी) –  13 सामने 29 विकेट- 2. आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)- 13 सामने 22 विकेट 3. जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)- 13 सामने 19 विकेट 4.मोहम्मद शमी (पंजाब किंग्स) – 14 सामने 19 विकेट 5. अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स)-  12 सामने 18 विकेट

पर्पल कॅपची संपूर्ण यादी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

भारताचा किती द्वेष करणार पाकिस्तान? वर्ल्ड कपच्या जर्सीवर तिसऱ्याच देशाचं नाव

VIDEO: भारीच! भारताला मिळाला वकार युनिससारखा गोलंदाज, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उम्रानची बोलिंग अॅक्शन एकदा पाहाच!

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

(RCB Bowler Harshal Patel sets new record of most wickets by indian bowler in single season of IPL breakes Jasprit bumrah record)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें