IND VS NZ : टीम इंडिया अडचणीत, विराट कोहलीला मार्गदर्शनाची गरज; गौतम गंभीरचे धोनीला आवाहन

T20 विश्वचषक 2021 च्या 28 व्या सामन्यात दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाने पहिला सामना गमावल्याने आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

IND VS NZ : टीम इंडिया अडचणीत, विराट कोहलीला मार्गदर्शनाची गरज; गौतम गंभीरचे धोनीला आवाहन
Virat Kohli - MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 7:26 PM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 च्या 28 व्या सामन्यात दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाने पहिला सामना गमावल्याने आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ पाकिस्तानकडून पराभूत झाले आहेत. भारतासाठी हा सामना एखाद्या व्हर्च्युअल उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. जर भारताने हा सामना गमावला तर त्यांना उपांत्य फेरी गाठणे कठीण होईल. (Gautam gambhir says team india and Virat Kohli need MS Dhoni’s guidance)

या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठी गोष्ट सांगितली आहे. गौतम गंभीरचे असे मत आहे की, परिस्थिती खूप कठीण आहे, टीम इंडिया अडचणीत आहे, त्यामुळे विराट आणि कंपनीला आता धोनीच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

गौतम गंभीरने टाईम्स ऑफ इंडियाशी खास संवाद साधताना सांगितले की, “माझ्यासाठी धोनी आणि त्याच्या अनुभवावर बरेच काही अवलंबून आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो सर्वात शांत क्रिकेटपटू आहे. अशा कठीण परिस्थितीत फलंदाजी कशी करायची हे फक्त तोच विराट कोहलीला सांगू शकतो. धोनीला फक्त T-20 विश्वचषकासाठी भारताचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे आणि अशा प्रसंगी संघाला त्याची सर्वाधिक गरज भासेल. धोनीने आपल्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अशा परिस्थितीचा अनेकदा सामना केला असून न्यूझीलंडविरुद्ध भारताला यश मिळेल अशी आशा आहे.”

भारत-न्यूझीलंडमध्ये कांटे की टक्कर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मध्ये नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळते. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी 8-8 सामन्यात विजय मिळवले आहेत. पण गेल्या T20 विश्वचषकापासून भारताने सलग 8 T-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. पण दुबईबद्दल बोलायचे तर येथील खेळपट्टीवर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. दुबईच्या मैदानावर दव आहे, त्याचा फायदा नंतर फलंदाजीला होतो.

भारताची प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, केन विल्यमसन, जेम्स नीशम, अॅडम मिल्न, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.

इतर बातम्या

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे

(Gautam gambhir says team india and Virat Kohli need MS Dhoni’s guidance)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.