AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : तू अपरिपक्व, युवा खेळाडूंसाठी आदर्श बनू शकत नाहीस, गौतम गंभीर विराट कोहलीवर भडकला

कॅप्टन विराट कोहली, के एल राहुल आणि रविचंद्रन आश्विन यांनी राग व्यक्त केल्यानंतर कोहली टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीका केली जातेय. माजी सलामीवीर गौतम गंभीरनं विराट कोहलीनं अपरिपक्वता दाखवल्याची टीका केली.

Gautam Gambhir : तू अपरिपक्व, युवा खेळाडूंसाठी आदर्श बनू शकत नाहीस, गौतम गंभीर विराट कोहलीवर भडकला
विराट कोहली गौतम गंभीर
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND VS SA) सध्या केपटाऊन इथं तिसरी कसोटी सुरू आहे. या कसोटी दरम्यान घडलेल्या एका प्रसंगावरून माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी दरम्यान तिसऱ्या दिवशी रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गर मैदानावरील पंचांनी एलबीडब्ल्यू आऊट दिलं होतं. मात्र, त्यानंतर डीन एल्गरनं डीआरएस घेतला. डीआरएसचा निर्णय एल्गरच्या बाजूनं गेला. यानंतर विराट कोहलीनं रागाच्या भरात आफ्रिकन प्रक्षेपक सुपरस्पोर्टवर टिप्पणी केली. फक्त विरोधी टीम वर लक्ष देण्याऐवजी आपल्या टीमवरही लक्ष द्यायला हवं ज्यावेळी ते बॉल चमकवत होते, अशी टिप्पणी विराट कोहलीनं स्टम्प माईक जवळ जाऊन केली. यावरुनचं गौतम गंभीर भडकला आहे.

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

कॅप्टन विराट कोहली, के एल राहुल आणि रविचंद्रन आश्विन यांनी राग व्यक्त केल्यानंतर कोहली टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीका केली जातेय. माजी सलामीवीर गौतम गंभीरनं विराट कोहलीनं अपरिपक्वता दाखवल्याची टीका केली.

गौतम गंभीरनं स्टार स्पोर्टस बोलताना कोहली अपरिपक्व आहे. भारतीय कॅप्टननं स्टंम्प माईकवर अशा गोष्टी बोलणं हे चुकीचं आहे. अशा गोष्टी करुन तू कधीचं युवा खेळाडूंचा आदर्श बून शकत नाहीस, असं गौतम गंभीर म्हणाला. पहिल्या डावात विकेटकीपरचा विषय 50-50 होता. मात्र, त्यावेळी तू शांत होतास आणि मयंक अग्रवाल अपील करत होता. मला वाटत प्रशिक्षक राहुल द्रविड यानं याची दखल घ्यायला हवी, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.

स्टंम्प माईकवर कोण कोण काय म्हणालं?

विराट कोहली काय म्हणाला?

विराट कोहली स्टंम्पसजवळ जाऊन म्हणाला. “फक्त विरोधी टीमवरच नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष द्या. नेहमी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असता”

अश्विन काय म्हणाला?

‘जिंकण्यासाठी तुम्ही दुसरे चांगले मार्ग शोधा सुपरस्पोर्ट’ असं अश्विनने सुनावलं. सामन्याचे प्रक्षेपण करणारे या बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीची व्यवस्था करतात. दक्षिण आफ्रिकेत सामन्याचे प्रक्षेपण सुपरस्पोर्ट करत आहे. त्यांनी काही तरी फेरफार केला, असं अश्विनचं म्हणण होतं.

केएल राहुल काय म्हणाला?

‘अकरा जणांविरोधात संपूर्ण देश खेळतोय’, असे केएल राहुलने म्हटलं. राहुल भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. तिसऱ्या पंचांनी घरच्या संघाला म्हणजे दक्षिण आफ्रिकेला फेवर केलं, असं राहुलचं म्हणणं होतं.

इतर बातम्या:

IND vs SA: विराट कोहलीची सटकली, DRS वरुन भारतीय प्लेयर्सनी मैदानात केला ‘राडा’

IND vs SA: रहाणे-पुजारा फेल होऊनही चान्स वर चान्स, यामध्ये ‘हे’ चार खेळाडू न खेळताच होतायत म्हातारे

Gautam Gamhir calls Virat Kohli immature slam said you never ideal for youngsters

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.