AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glenn Maxwell चं चेसिंग करताना द्विशतक, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

Glenn Maxwell Double Century | ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलिया अडचणीत असताना त्याने निर्णायक द्विशतक ठोकलं आणि सोबत एकहाती विजयही मिळवून दिला.

Glenn Maxwell चं चेसिंग करताना द्विशतक, वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
| Updated on: Nov 07, 2023 | 11:14 PM
Share

मुंबई | क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जात. क्रिकेट चाहत्यांना आज हेच पाहायला मिळालं. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तावर अशक्य असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. ग्लेन मॅक्सवेल याने ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामना एकहाती जिंकून दिला. ग्लेन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावाचं आव्हान दिलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 91 बाद 7 अशी स्थिती झाली होती. मात्र तिथून मॅक्सवेलने कॅप्टन पॅट कमिन्स याच्या सोबतीने सामना फिरवला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची विजयी आणि ऐतिहासिक भागीदारी केली.

ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 धावांची गरज असताना सिक्स ठोकून विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या सिक्ससह वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. मॅक्सवेल क्रिकेट विश्वात धावांचा पाठलाग करताना द्विशतक करणारा पहिलाच फलंदाच ठरला. ग्लेनने नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली. ग्लेनने 128 बॉलमध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने पॅट कमिन्स याने 68 बॉलमध्ये नॉट आऊट 12 रन्स करत अप्रतिम साथ दिली.

मॅक्सवेलचं द्विशतकासह अनेक रेकॉर्ड्स

ग्लेन मॅक्सवेल वनडेत द्विशतक करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई आणि एकूण नववा फलंदाज ठरला. तसेच मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात आणि वर्ल्ड कपमध्ये चेसिंग करताना द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरलाय. ग्लेन मार्टिन गुप्टील आणि ख्रिस गेल यांच्यानंतर वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तिसरा फलंदाज ठरलाय. मार्टिन आणि ख्रिस गेल या दोघांनी 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी केली होती. मात्र त्यांनी पहिल्या डावात हा कारनामा केला होता.

ग्लेनचं ऐतिहासिक शतक

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.