AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : ..आपण मुंबईत आहोत, सचिनची मेस्सीसमोर मराठीत ‘ओपनिंग’, क्रिकेटचा देव काय म्हणाला? पाहा व्हीडिओ

Sachin Tendulkar Marathi Speech Wankhdede Stadium : मुंबईत आज क्रिकेट चाहत्यांना ऐतिहासिक असा क्षण अनुभवायला मिळाला. चाहत्यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा जादुगार लिओनेल मेस्सी या दोघांना एकत्र पाहायला मिळालं. सचिनने या दरम्यान चाहत्यांशी मराठीत संवाद साधला.

Sachin Tendulkar : ..आपण मुंबईत आहोत, सचिनची मेस्सीसमोर मराठीत 'ओपनिंग', क्रिकेटचा देव काय म्हणाला? पाहा व्हीडिओ
Lionel Messi and Sachin TendulkarImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 14, 2025 | 8:57 PM
Share

अर्जेंटिनाचा स्टार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. मेस्सीचं फुटबॉल चाहत्यांनी आणि मुंबईकरांनी स्टेडियममध्ये जल्लोषात स्वागत केलं. चाहत्यांनी “मेस्सी मेस्सी” असा जयघोष केला. मेस्सीनेही चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केलं. तसेच यावेळेस मेस्सीच्या हस्ते राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस मेस्सीसोबत मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’अंतर्गत 13 वर्षांखालील 60 खेळाडूंना फुटबॉलचे धडे दिले जाणार आहेत.

आणि सचिनची एन्ट्री

प्रोजेक्ट महादेवा‘चं उद्घाटन करण्यात आल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला मैदानात बोलावण्यात आलं. सचिनने मेस्सीसोबत संवाद साधला. तसेच सचिनने या दरम्यान स्टेडियममधील उपस्थितीत चाहत्यांना आणि मुंबईकरांना मराठीत संबोधित केलं. सचिनने या दरम्यान मेस्सीच्या केलेल्या स्वागतासाठी चाहत्यांचे आभार मानले. तसेच सचिनने वानखेडेवरील आपल्या स्मृतींना उजाळा दिला.

मेस्सी आणि सचिन हे दिग्गज एकत्र आल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सचिनने त्याची 10 नंबरची ऑटोग्राफ असलेली जर्सी मेस्सीला भेट दिली. तर मेस्सीने सचिनला फुटबॉल दिला. दोघांनी एकमेकांसह संवाद साधला. त्यानंतर सचिनने उपस्थित चाहत्यांसह मराठीत काय संवाद साधला? हे जाणून घेऊयात.

सचिनचं चाहत्यांसोबत मराठीत संबोधन

सचिनने मेस्सीसमोर चाहत्यांना मराठीत संबोधित करुन मनं जिंकली. सचिनने काही मिनिटं मराठीत संबोधित केलं. त्यानंतर सचिनने इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. “नमस्कार मुंबई, काय कसं काय? सर्वप्रथम माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद. सचिनने अशाप्रकारे उपस्थितांची आस्थेवाईक विचारपूस करत जाहीर आभार मानले.

“आपण मुंबईत आहोत. तुम्ही ज्यापद्धतीने लिओ, लुईस आणि रॉड्रिग्संचं स्वागत केलं त्यासाठी धन्यवाद”, असं म्हणत सचिनने या तिघांच्या वतीने चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर सचिनने इंग्रजीत सुरुवात केली. सचिनचा मराठीत केलेल्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“मी इथे (वानखेडे स्टेडियममध्ये) अनेक क्षण अनुभवलेत. आपण मुंबईला स्वप्न नगरी म्हणतो. याच मैदानात अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत”, असं सचिनने म्हटलं. तसेच सचिनने 2011 च्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला. टीम इंडियाने याच वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेला पराभूत करत 1993 नंतर वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. “या मैदानावर 2011 साली तुमच्या पाठिंब्याशिवाय सुवर्णक्षण अनुभवता आला नसता”, असं संबोधन करत सचिन पुन्हा एकदा वर्ल्ड कप विजयाच्या आठवणीत रमलेला दिसला.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी