IPL 2022 Qualifier 1: कोलकात्यात मोसम बेईमान, GT vs RR मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला, तर ‘या’ 3 गोष्टी घडतील

IPL 2022 Qualifier 1: गुजरात आणि राजस्थान या दोन टॉप टीममधील लढतीत पावसाने व्यत्यय आणू नये, एवढीच चाहत्यांची अपेक्षा असेल. आज क्वालिफायर वनच्या लढतीवेळी कोलकात्यातील वातावरण कसं राहिलं, ते जाणून घेऊया.

IPL 2022 Qualifier 1: कोलकात्यात मोसम बेईमान, GT vs RR मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला, तर 'या' 3 गोष्टी घडतील
Representative imageImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:37 AM

मुंबई: IPL 2022 मध्ये आजपासून प्लेऑफची लढाई सुरु होईल. आता प्रत्येक सामना थेटे किताब जिंकण्यासाठीच असेल. आज कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर प्लेऑफचा पहिला सामना होत आहे. या सामन्याला खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोलकात्यात पाऊस कोसळण्याची आणि वादळाची (Kolkata Bad weather) शक्यता कायम आहे. एकदिवसाआधीच वादळामुळे कोलकात्यात नुकसान झालं. इडन गार्डन्स (Eden Gardens) स्टेडियमवरही नुकसान झालं. आज क्वालिफायरचा पहिला सामना होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) हे दोन संघ आमने-सामने आहेत. क्रिकेट चाहत्यांना फक्त पावसाची चिंता सतावतेय. पावसामध्ये या सामन्याचा रोमांच वाहून जाऊ नये, एवढीच क्रिकेट चाहत्यांची प्रार्थना आहे.

कोलकात्यातील वातावरण कसं राहिलं?

पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये सर्वातआधी याच टीमने प्रवेश केला होता. राजस्थान रॉयल्सची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन टॉप टीममधील लढतीत पावसाने व्यत्यय आणू नये, एवढीच चाहत्यांची अपेक्षा असेल. आज क्वालिफायर वनच्या लढतीवेळी कोलकात्यातील वातावरण कसं राहिलं, ते जाणून घेऊया.

आज तापमान किती असेल?

कोलकात्यात मंगळवारी वातावरण उबदार राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अंगातून घामाच्या धारा वाहतील. शहरातील तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस आणि आद्रता जास्त रहाण्याची शक्यता आहे. दिवसा पावसाची शक्यता नाहीय. पण गुजरात वि राजस्थान क्वालिफायर वन सामन्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरात वि राजस्थान सामन्यावेळी पाऊस कोसळला, तर पुढे या 3 गोष्टी घडू शकतात

पहिली शक्यता

अगदी 5 ओव्हरचा खेळही होऊ शकला नाही, तर सुपरओव्हरने सामन्याचा निकाल लागेल.

दुसरी शक्यता

सुपर ओव्हरही होऊ शकली नाही, तर पॉइंट्स टेबलमध्ये जी टीम टॉपवर आहे, त्या टीमला विजेता घोषित करण्यात येईल. म्हणजे ती टीम फायनलमध्ये पोहोचेल.

तिसरी शक्यता

एक इनिंगचा खेळ झाला आणि दुसऱ्या इनिंगच्यावेळी पाऊस आला, तर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सामन्याचा निकाल लागेल.

पीच रिपोर्ट

कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. फलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल आहे. पण त्याचवेळी फिरकी गोलंदाजांना सुद्धा मदत मिळेल. इडन गार्डन्सवर आयपीएलचा पहिला सामना होत आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वादळामुळे इडन गार्डन्सवर काय नुकसान झालय, त्याची स्वत: जाऊन पाहणी केली. प्लेऑफच्या सामन्यासाठी कॅबने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण दिलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.