AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH Live Streaming : गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्याच्या वेळेत बदल? मॅच किती वाजता?

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad, IPL 2026 Live Scorecard: गुजरात टायटन्स आपल्या घरच्या मैदानात अहमदाबादमधील नरेंद्र स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. या सामन्यात कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

GT vs SRH Live Streaming : गुजरात विरुद्ध हैदराबाद सामन्याच्या वेळेत बदल? मॅच किती वाजता?
Gujarat Titans vs Sunrisers HyderabadImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 12, 2026 | 9:17 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा (IPL 2026) रंगतदार स्थितीत पोहचली आहे. प्लेऑफच्या हिशोबाने प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून 2 संघांचा पत्ता कट झाला आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचं 19 व्या हंगामातून अधिकृत पॅकअप झालं आहे. त्यामुळे आता 4 जागांसाठी 8 संघात थेट लढत आहे. या 19 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 55 सामने खेळवण्यात आले आहेत. तर 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहचण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे या सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गुजरात-हैदराबादमध्ये टफ फाईट

गुजरात आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा 12 वा सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 19 व्या हंगामात 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर गुजरात आणि हैदराबाद दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आता प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. या निमित्ताने उभसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना मंगळवारी 12 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी