Happy Birthday MS Dhoni: धोनीचा आधी थोडासा डान्स, मग 41 व्या बर्थ डे चा कापला केक, साक्षीने शेयर केला व्हिडिओ

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू एमएस धोनी आज त्याचा 41 वा वाढदिवस (MS Dhoni 41 st Birthday) साजरा करत आहे.

Happy Birthday MS Dhoni: धोनीचा आधी थोडासा डान्स, मग 41 व्या बर्थ डे चा कापला केक, साक्षीने शेयर केला व्हिडिओ
ms dhoniImage Credit source: VideoGrab/Twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:54 AM

मुंबई: टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू एमएस धोनी आज त्याचा 41 वा वाढदिवस (MS Dhoni 41 st Birthday) साजरा करत आहे. यंदाच्या वाढदिवसाला धोनी लंडन (London) मध्ये आहे. कुटुंबासोबत असलेल्या धोनीने तिथेच बर्थ डे केक कापला. पण केक कापण्याआधी धोनीची पावलं सुद्धा थिरकली. धोनीच्या 41 व्या वाढदिवसाला त्याच्या केक कटिंग सेरेमनीचा व्हिडिओ पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) शेयर केलाय. 7 जुलै 1981 रोजी धोनीचा जन्म झाला. धोनी पत्नी साक्षीसोबत काही दिवसांपूर्वीच लंडनला गेला आहे. आपल्या लग्नाचा 12 वा वाढदिवस सुद्धा त्याने तिथेच साजरा केला होता. आता 41 वा वाढदिवसही त्याने लंडन मध्ये सेलिब्रेट केलाय. धोनीच्या वाढदिवसाचा लंडन मध्ये उत्साह होता. तसाच भारतातही धोनीच्या चाहत्यांनी आपल्या स्टाइल मध्ये वाढदिवस साजरा केला.

धोनीचा डान्स

साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर धोनीच्या केक कटिंगचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात एक गाणं वाजतय. नायजेरियन सिंगर फिल्जने गायलेलं हा गाणं आहे. गाण्याचं म्युझिक इतकं जबरदस्त आहे की, धोनीने स्वत: केक कापण्याआधी डान्स केला. व्हिडिओत भिंतीवर चिकटवलेला धोनीचा पोस्टरही स्पष्ट दिसतो.

41 फुटाचा कटआउट

धोनीने थोडा डान्स केल्यानंतर मेणबत्त्यांवर फुंकर मारुन केक कापला. धोनीला वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा सहाजिक पत्नी साक्षीने दिल्या. धोनीचे भारतातील चाहतेही त्याचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करतायत. MS Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भले निवृत्त झाला असेल, पण क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता आजही टिकून आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना, त्याच्याबद्दल जी क्रेझ होती, तीच आजही कायम आहे. भारतात धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. याचच आणखी एक उदहारण समोर आहे. एका चाहत्याने धोनीचं 41 फुटाचं कटआउट उभारलय.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.