IND vs SL : गंभीर चुकलाच! वादळी शतक ठोकणाऱ्या युवराजच्या शिष्यालाही तो विसरला, हरभजन सिंह बरसला
Harbhajan Singh on Team India : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने या निवडीबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. दोन खेळाडूंना संघात जागा न दिल्याने त्याने संताप व्यक्त केलाय.

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. कोचपदी गौतम गंभीरची निवड झाल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिला दौरा असणार आहे. गुरूवारी बीसीसीआयने टीमची घोषणा केली पण यामध्ये प्रतिभावान खेळाडूंना डावलण्यात आलंय. सर्वात मोठा बदल म्हणजे टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडसह एक असा खेळाडू आहे त्यालाही कोणत्याच टीममध्ये जागा मिळालेली नाही. तो जो खेळाडू आहे त्याच्यात संपूर्ण सामना पालटवण्याची क्षमता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी झिम्बाव्बे दौऱ्यासाठी निवडलेल्या टीममधील स्फोटक खेळाडूची श्रीलंकेसाठी निवड केली गेली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक शर्मा आहे. अभिषेकने झिम्बाव्बे दौऱ्यामधील टी-20 सामन्यात वादळी शतक ठोकलं होतं. युवराज सिंहचा शिष्य असलेल्या अभिषेकला श्रीलंका दौऱ्यामधून वगळल्याने क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. हरभजन सिंहने अभिषेकसह टॉप स्पिनर युजवेंद्र चहल यालाही न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
टीम इंडियामध्ये संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा यांची निवड का नाही झाली? हे समजणं कठीण असल्याचं हरभजन सिंहने म्हटलं आहे. युजवेंद्र चहल तर वर्ल्ड कप टीममध्ये होता पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर संजू सॅमसन याला वन डे टीममध्ये घेतलं नाही तर अभिषेक शर्माला तर कोणत्याच टीममध्ये खेळण्याची संधी नाही.
श्रीलंकेसाठी भारताचा T20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंकेसाठी भारताचा T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नो, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज