AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : प्रेशर मोमेंटला फूल कॉन्फिडन्स रिअ‍ॅक्शन…’अरे तुझा भाऊ सर्व …’

रविवारी भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना सामना थोडासा अखेरीस अडकला. या दरम्यान, एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याविषयी अधिक जाणून घ्या...

Hardik Pandya : प्रेशर मोमेंटला फूल कॉन्फिडन्स रिअ‍ॅक्शन...'अरे तुझा भाऊ सर्व ...'
मॅच दरम्यान हार्दिक पांड्या जे बोलला ते सर्वांना आवडलंImage Credit source: aaj tak
| Updated on: Aug 30, 2022 | 6:15 PM
Share

नवी दिल्ली : बर्‍याच वेळा जेव्हा सामान्य  गोपाहताष्टी अडकू लागतात तेव्हा आपण मित्र-मैत्रिणींमध्ये म्हणतो की टेन्शन मत ले, तेरा भाई है ना, तेरा भाई कर लेगा, असं आपण आगदी सहज म्हणतो.  रविवारी आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ आमनेसामने आले आणि सामना अखेर अडकला, तेव्हा हार्दिक पांड्याची अशी प्रतिक्रिया (Hardik Pandya Confidence Reaction) समोर आली आहे, जिथे तो अशा पद्धतीने दिसतोय की, सर्व काही तुमचा भाऊ हाताळेल. तेरा भाई सब कर लेगा, असंच या व्हिडीओतून दिसूनही आलं. वास्तविक रविवारी भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना त्या वेळी सामना थोडासा अखेरीस अडकला. या दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात व्हिडीओत नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया, त्यापूर्वी पाहूया नेमकं काय झालं होतं.

हा व्हिडीओ पाहा

नेमकं काय झालं होतं?

भारताला शेवटच्या दोन षटकात 21 धावा हव्या होत्या. 19व्या षटकात तीन चौकारांमुळे एकूण 14 धावा आल्या, तर शेवटच्या षटकात 7 धावा हव्या होत्या. पण शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने प्रकरण पुन्हा रंजक बनले. यानंतर दिनेश कार्तिक क्रिजवर आला, त्याने सिंगल घेतली आणि स्ट्राईक हार्दिक पांड्याकडे आला.पण हार्दिक स्ट्राईकवर येताच त्याने डॉट बॉल खेळला. यानंतर हार्दिक पांड्याची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

हा व्हिडीओ पाहा

बोट दाखवत मान हलवत

जिथे तो दिनेश कार्तिककडे बोट दाखवत मान हलवत आहे आणि हीच गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, लोकांना ती खूप आवडली. सोशल मीडियाने हार्दिक पांड्याच्या आत्मविश्वासाची जोरदार प्रशंसा केली आणि म्हटले की त्याला हार्डकोर आत्मविश्वास म्हणतात.  हार्दिक पांड्या हा पाकिस्तानविरुद्ध भारताचा सर्वात मोठा सामना विजेता म्हणून समोर आलाय. जिथे त्यानं प्रथम गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.

आपल्या चार षटकांच्या कोट्यात हार्दिक पांड्याने केवळ 25 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. यानंतर फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने 17 चेंडूंत 4 चौकारांसह 33 धावा केल्या. आणि विजयी षटकाराचाही समावेश होता. हार्दिक पांड्या गेल्या काही वर्षात भारतासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे, फक्त एका वर्षात त्याच्यात मोठा बदल झाला आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.