न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिक पांड्याची निवड निश्चित होती, पण…! बीसीसीआयने दिलं कारण

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात हार्दिक पांड्याला स्थान मिळालं नाही. त्याचं कारण बीसीसीआयने दिलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिक पांड्याची निवड निश्चित होती, पण...! बीसीसीआयने दिलं कारण
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिक पांड्याची निवड निश्चित होती, पण...! बीसीसीआयने दिलं कारण
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 03, 2026 | 6:00 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची निवड केली आहे. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरचं संघात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर मोहम्मद सिराजलाही संघात स्थान मिळालं आहे. श्रेयस अय्यरच्या नावापुढे बीसीसीआयने स्टार मार्क केला आहे. त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) कडून फिटनेस क्लिअरन्स मिळवावे लागेल. अय्यरला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दुखापतीतून बरे झाल्यानंतर 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. पण या संघातून हार्दिक पांड्याला डावललं आहे. हार्दिक पांड्या फॉर्मात असून त्याला डावलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विजय हजारे ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफीत त्याने झंझावाती शतक ठोकलं होतं. सातव्या क्रमांकावर उतरत 92 चेंडूत 133 केल्या. यात 11 षटकार आणि 8 चौकार मारले. पण असं असूनही त्याला संघात निवडलं नाही. याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.

विजय हजारे ट्रॉफीत विदर्भविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने दोन षटकं टाकली. तसेच 15 धावा दिल्या. त्यानंतर त्याला पुन्हा गोलंदाजी दिली नाही. दुसरीकडे, बीसीसीआयने हार्दिक पांड्याबाबत सोशल मीडियावर माहिती देत सांगितलं की, हार्दिक पांड्याला बीसीसीआयच्या सीओईने एका सामन्यात 10 षटकं टाकण्याची परवानगी दिलेली नाही. या व्यतिरिक्त टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याचं वर्कलोड मॅनेज केलं आहे.

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह आणि यशस्वी जायस्वाल.

दरम्यान हार्दिक पांड्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निवड केली आहे. ही मालिका 21 जानेवारीपासून आहे. तर शेवटचा सामना 31 जानेवारीला खेळला जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रिंकु सिंह.