IND vs NZ : कर्णधार शुबमन गिलची संघात निवड, पण…! वनडे मालिकेपूर्वी घडलं असं काही
शुबमन गिलच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर आता पु्न्हा नवं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे वनडे मालिकेत निवड झाली आहे. पण त्याच्या तब्येतीचा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या..

टीम इंडियाचा वनडे कर्णधार शुबमन गिल कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. त्या आधीच एक वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना मिळाली आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्याची संघात तर निवड झाली आहे, पण चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेत शुबमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित सामन्यात खेळता आलं नाही. त्यानंतर त्याची निवड न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप संघातही झाली नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून कमबॅक करेल अशी आशा आहे. पण त्या आधीच त्याच्याबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफीत शुबमन गिल सिक्किम विरूद्ध विजय हजारे ट्रॉफीत खेळणार होता. पण या सामन्यात काही खेळू शकला नाही. रिपोर्टनुसार, पंजाबकडून मैदानात उतरण्याची तयारी करणाऱ्या शुबमन गिलची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला या सामन्याला मुकावं लागलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची निवड केली आहे. नेमकं त्याच दिवशी त्याची तब्येत बिघडल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी फिट होईल का असा प्रश्नही पडला आहे. विजय हजारे ट्रॉफीत सिक्किम विरूद्धच्या सामन्यात शुबमन गिल उतरणार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी विजय हजारे ट्रॉफीत दोन सामने खेळण्याचं त्याचं ठरलं होतं. पण सिक्किम विरूद्धच्या सामन्यापूर्वी जेवल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. स्पोर्टस्टार्सच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, गिलला फूड पॉयजनिंग झाली आहे. त्यामुळे सिक्किम विरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.
शुबमन गिल शुक्रवारी रात्रीच चंदीगडवरून जयपूरला होता. आता 6 जानेवारीला गोव्याविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पण त्याची तब्येत बिघडल्याने निवड समितीला टेन्शन आलं असणार हे नक्की.. कारण त्याच्या नेतृत्वातच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. त्यामुळे वनडे मालिकेपूर्वी फिट होणार की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्या ऑक्टोबर महिन्यात टीम इंडियाच्या वनडे संघाची धुरा सोपवली होती. तेव्हा आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळू शकला आहे. दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता. कारण त्याला कसोटीत दुखापत झाली होती.
