AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik pandya: कॅप्टन असावा तर असा, हार्दिकच्या ‘या’ शब्दांमुळे शिवम मावी जबरदस्त खेळला

Hardik pandya: डेब्यु मॅचमध्ये इतकी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शिवम मावीला हार्दिक पंड्याने असं काय सांगितलं?

Hardik pandya: कॅप्टन असावा तर असा, हार्दिकच्या 'या' शब्दांमुळे शिवम मावी जबरदस्त खेळला
Hardik pandyaImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 04, 2023 | 11:01 AM
Share

India vs Sri Lanka Hardik Pandya: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाने 2 रन्सनी हा सामना जिंकला. टीम इंडियाकडून दीपक हुड्डा, शिवम मावी आणि अक्षर पटेलने कमालीचा खेळ दाखवला. या खेळाडूंमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्याने खेळाडूंच तोंडभरुन कौतुक केलं.

स्वत:च्या तब्येतीबद्दल हार्दिक म्हणाला, की….

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्याच कॅच पकडताना कॅप्टन हार्दिक पंड्याला दुखापत झाली. त्यामुळे काहीवेळ तो मैदानाबाहेर होता. सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, “क्रॅम्प आला होता. माझ्यात लोकांना घाबरवण्याची प्रवृत्ती आहे. हा फक्त क्रॅम्प होता. मी आता हसतोय, याचा अर्थ सर्वकाही ओके आहे. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही. तब्येत बरी नव्हती. पाणी कमी झालेलं”

मला टीमला कठीण प्रसंगात टाकायच आहे

शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिकने अक्षर पटेलच्या हाती चेंडू सोपवला. या निर्णयाबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, “मला टीमला कठीण प्रसंगात टाकायच आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यात मदत मिळेल. द्विपक्षीय सीरीजमध्ये आम्ही चांगली कामगिरी करतो. युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय” शिवम मावीबद्दल हार्दिक म्हणाला….

हार्दिक पंड्याने शिवम मावीच तोंडभरुन कौतुक केलं. डेब्यु मॅचमध्ये शिवमने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 4 विकेट काढल्या. “शिवम मावीला मी आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिलय. त्याची ताकत काय आहे, ते मला माहितीय. मी त्याला फक्त नॅचरल बॉलिंग करायला सांगितली. माझा पूर्ण पाठिंबा आहे. फलंदाजाने मोठे फटके खेळले तरी हरकत नाही, हे मी त्याला सांगितलं” असं हार्दिक म्हणाला.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....