AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh : IPL 2023 मध्ये मराठमोळ्या खेळाडूच्या 4 शब्दांची जादू, त्यानंतर रिंकूने जे घडवलं, तो इतिहास

Rinku Singh IPL 2023 : तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं, तरी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. मैदानात अनेकदा याच आत्मविश्वासाच्या बळावर चमत्कार घडतो. कालच्या सामन्यात रिंकू सिंहने तेच केलं.

Rinku Singh : IPL 2023 मध्ये मराठमोळ्या खेळाडूच्या 4 शब्दांची जादू, त्यानंतर रिंकूने जे घडवलं, तो इतिहास
Rinku Singh
| Updated on: Apr 10, 2023 | 8:50 AM
Share

Rinku Singh IPL 2023 : एक यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी तुमच्याकडे चांगली टेक्निक, झुंजारपणा, हिम्मत, क्षमता आणि त्वेष पाहिजे. हे गुण असले, तर तुम्ही यशस्वी होता. एखाद्या खेळाडूमध्ये हे गुण असतील, तर तो चांगली कामगिरी करणार हे स्वाभाविक आहे. पण, काहीवेळा अशी परिस्थिती येते, जेव्हा टेक्निक आणि क्षमता पुरेशी नसते. आत्मविश्वासही तितकाच महत्वाचा असतो. आयपीएल 2023 मधील सध्याचा सर्वात मोठा स्टार आहे रिंकू सिंह. त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी चार शब्द पुरेसे आहेत.

रविवारी 9 एप्रिलला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना झाला. ही मॅच पाहण्यासाठी जे स्टेडियममध्ये उपस्थित होते, ते कधीही हा सामना विसरणार नाहीत. टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये ज्यांनी हा सामना पाहिला, ते नेहमी रिंकू सिंहच नाव लक्षात ठेवतील.

ते शब्द आणि सिक्स

गुजरात टायटन्सने केकेआरला विजयासाठी 205 धावांच टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तरात केकेआरने 19 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या. लास्ट ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती. . गुजरात टायटन्सचा यश दयाल लास्ट ओव्हर टाकत होता. पहिल्या बॉलवर सिंगल काढून उमेश यादवने रिंकू सिंहला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने जे केलं, ते अद्भूत होतं. अशा चमत्काराची कोणीही अपेक्षा केली नव्हती. रिंकूने यशच्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कॅमेऱ्यासमोर बोलताना रिंकू म्हणाला की, मला स्वत:वर विश्वास होता. पण उमेश यादवच्या शब्दांनी सुद्धा आत्मविश्वास भरला.

प्रेजेंटेशनच्यावेळी रिंकू काय म्हणाला?

मॅचनंतर अवॉर्ड प्रेजेंटेशनच्यावेळी रिंकूने उमेश यादवचे ते शब्द आठवले. उमेश यादव रिंकूला एवढच म्हणाला, ‘विचार नको करु, मार रिंकू’. त्यानंतर रिंकूने यश दयालच्या बॉलिंगवर एकापाठोपाठ एक पाच सिक्स मारले.

त्याचं छोटं पण महत्वाच योगदान

उमेश यादवसाठी हा सामना तसा खास नव्हता. पण त्याच योगदान सुद्धा तितकच महत्वाच आहे. उमेश यादवने आधी वेगाने धावा काढणाऱ्या शुभमन गिलची कॅच पकडली. त्यानंतर उमेशने 6 चेंडूत 5 धावा केल्या, त्यामुळे केकेआरच आव्हान टिकून राहीलं. उमेशने रिंकूसोबत 21 चेंडूत नाबाद 52 धावांची भागीदारी केली. 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर उमेशने रिंकूला स्ट्राइक देऊन आपलं काम चोख बजावलं. कॅप्टनलाही विश्वास

रिंकू सिंह आधीपासून केकेआरसाठी मॅचविनिंग इनिंग खेळलाय. आताचा कॅप्टन नितीश राणाने सुद्धा रिंकूला सुरुवातीपासून पाठिंबा दिलाय. त्याला सुद्धा रिंकूवर विश्वास होता.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.