Pandya’s Wife Reaction : अहो काय हे…! पांड्याच्या फ्लाइंग बॅटवर त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, पाहा खास Video

हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक आश्चर्यचकित झाली. नताशाची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती.

Pandya's Wife Reaction : अहो काय हे...! पांड्याच्या फ्लाइंग बॅटवर त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, पाहा खास Video
पांड्याच्या फ्लाइंग बॅटवर त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शनImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:20 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये वानखेडे स्टेडियमवर इंडियम प्रिमीयर लीगमधला 67 वा सामना खेळला गेला. लीगमधली टॉपवर असलेली टीम गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (GT vs RCB) ही लढत झाली. गुजरातची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. RCB ला प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय आवश्यकच होता. आरसीबीने हा सामना जिंकला. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही ते टिकून आहेत. सलामीवीर विराट कोहली (Virat kohli) (73) आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिस (44) यांच्या फलंदाजीच्या बळावर बँगलोरने गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) आठ विकेट राखून विजय मिळवला. दरम्यान, काल हार्दिक पांड्याच्या फाइंग बॅटवर त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन काही वेगळीच होती. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

नताशा स्टॅनकोविक शॉक

गुजरातच्या फलंदाजीदरम्यान हार्दिक पांड्याने दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झटपट फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान त्याची बॅट चुकली आणि ती थेट स्क्वेअर लेग अंपायरकडे जाऊन पडली. अशा स्थितीत स्टँडमध्ये बसलेल्या हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक आश्चर्यचकित झाली. नताशाची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती. त्याने पुन्हा हातवारे करून विचारले की काय झाले? नताशाची ही रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पांड्याची फ्लाइंग बॅट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या पराभवानंतरही गुजरातला फारसा फरक पडला नाही कारण या संघाने प्रथमच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. साखळी टप्प्यात संपूर्ण 14 सामने खेळल्यानंतर गुजरात संघ 10 विजय आणि 4 पराभवानंतर 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

टायटन्सने 5 बाद 168 धावा केल्या

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हार्दिक पांड्या (47 चेंडूत नाबाद 62) याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीकडून कोहलीने 54 चेंडूत 73 आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने 38 चेंडूत 44 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटच्या भागीदारीत 115 धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेल 18 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला कारण आरसीबीने आठ चेंडू बाकी असताना विजयाची नोंद केली.

नाबाद 62 धावांची खेळी

गुजरातचा संघ या धावसंख्येचा बचाव करू शकला नाही आणि त्यांना बंगळुरूकडून 8 गडी राखून पराभूत व्हावे लागले. गुजरातकडून कर्णधार पांड्याने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 47 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावांची खेळी केली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.