AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hong Kong Sixes: पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारताचा पुढचा सामना कोणासोबत? जाणून घ्या सर्व डिटेल

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. आता दुसरा सामना कोणाशी होणार आणि कधी ते जाणून घ्या.

Hong Kong Sixes: पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारताचा पुढचा सामना कोणासोबत? जाणून घ्या सर्व डिटेल
Hong Kong Sixes: पाकिस्तानला लोळवल्यानंतर भारताचा पुढचा सामना कोणासोबत? जाणून घ्या सर्व डिटेलImage Credit source: Getty Images
| Updated on: Nov 07, 2025 | 9:56 PM
Share

हाँगकाँग्र सिक्सेस 2025 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी पराभूत केलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडी गमवून 86 धावा केल्या. रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली यांनी चांगली सुरुवात करून दिली. उथप्पाने 11 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार मारत 28 धावा केल्या. भारताने विजयासाठी दिलेल्या 86 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 3 षटकात 1 गडी गमवून 41 धावा केल्या. ख्वाजा 18, तर अब्दुल 16 धावांवर खेळत होते. पण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 2 धावांनी विजय मिळवला.

भारताचा दुसरा सामना कोणासोबत?

आता भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारताचा पुढचा सामना कुवैतशी होणार आहे. कारण भारत, पाकिस्तान आणि कुवैत हे संघ गट क मध्ये आहेत. त्यामुळे पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताचा सामना कुवैतशी होणार आहे. हा सामना 8 नोव्हेंबरला मोंग कोकच्या मिशन रोड ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा सामना कुवैतसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. दुसऱ्या सामन्यातील विजय भारताला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देईल. पण पराभव झाल्यास नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध कुवैत सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनेलवर असेल. तसेच फॅनकोड एप आणि वेबसाईटवर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत : रॉबिन उथप्पा, भरत चिपली (विकेटकीपर), स्टुअर्ट बिन्नी, दिनेश कार्तिक (कर्णधघार), अभिमन्यु मिथुन, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल.

कुवैत : अदनान इदरीस, मीत भावसार, बिलाल ताहिर, उस्मान पटेल (विकेटकीपर), यासीन पटेल (कर्णधार), मोहम्मद शफीक, रविजा संदारुवान.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.